Get it on Google Play
Download on the App Store

बॅडमिंटन : एक भारतीय खेळ

अक्षर प्रभू देसाई

साईना नेहवाल आणि के श्रीकांत इत्यादी भारतीय बॅडमिंटन खेळाडू भारताचे नाव बॅडमिंटन मॅप वर प्रसिद्ध करत असताना ह्या खेळाची एक गोष्ट मात्र सगळ्यांनाच चकित करते. बॅडमिंटन हा भारतात उगम पावलेला शोध आहे इतकेच नाही तर हा खेळ सुरूच झाला मुळी आमच्या पुण्यांत. ह्या खेळाचे सुरवातीचे नाव होते "पूना".

पुण्या बाहेरच्या घाटांत एक विशिष्ट प्रकारची फुले उगवत असत जी पाहायला बॅडमिंटनच्या शटल प्रमाणे दिसत असत. लहान मुले हाताने त्याला उडवून खेळत असत. काही ब्रिटिश सैनिक अधिकाऱ्यांनी हे पहिले आणि त्यांनी टेनिस रॅकेट वापरून खेळायला सुरुवात केली. हळू हळू रॅकेट चा आकार बदलला आणि फुलांची जागा कोंबडीच्या पिसांनी केलेल्या शटल ने घेतली. १८६० मध्ये एक ब्रिटिश अधिकाऱ्याने "Battledore and Shuttlecock" ह्या शब्दाने खेळाचा इतिहास आणि नियम लिहिले. ह्या पुस्तकाची एक प्रत आजही इंग्लंड मधील वस्तुसंग्रहालयांत आहे. पण फुले आणि लाकडी रॅकेट घेऊन हा खेळ भारत, चीन आणि श्रीलंका भागांत किमान २००० वर्षां पासून खेळला जायचे असे पुरावे विविध ठिकाणी आढळून आले आहेत. युरोपात सुद्दा अश्या प्रकारचा खेळ किमान ४०० वर्षे तरी खेळला जायचा पण खेळाची जन्मभूमी म्हणून भारताचेच नाव घेतले जाऊ शकते.

इंग्लंड मध्ये १८९० मध्ये ह्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली आणि डेन्मार्क, कॅनडा इत्यादी देशांनी सभासद म्हणून भाग घेतला. काहीच कालावधीत डेन्मार्क मध्ये हा खेळ तुफान लोकप्रिय झाला आणि डेन्मार्कचे खेळाडू चॅम्पियन बनले. युरोपिअन राष्ट्रांची मक्तेदारी ह्या खेळांत बराच काळ चालली पण हळू हळू त्याची जागा टेनिस ने घेतली आणि बॅडमिंटन खेळातील त्यांचा सहभाग कमी झाला.

पण मागील काही दशकांत हा खेळ चीन, जपान, मलेशिया, इंडोनेशिया इथे जास्त प्रसिद्ध झाला. मागील ५ वर्षांत भारताने पुन्हा ह्या खेळांत ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. साईना नेहवाल , कादम्बई श्रीकांत ह्यांनी ह्या खेळांत जो ठसा उमटवला आहे त्याचे खूप मोठे श्रेय प्रकाश पदुकोण आणि पुल्लेला गोपीचंद ह्यांना आहे. ह्या दोन्ही खेळाडूंनी प्रतिकूल परीस्तीत कठोर परिश्रम करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वप्रथम स्पर्धा जिंकल्या आणि नंतर भारतात विविध ठिकाणी बॅडमिंटन अकादमी सुरु करण्यात मोलाचा वाटा उभारला.

आज भारतात क्रिकेट मागोबर बॅडमिंटन चा नंबर लागतो. पैसे, स्पर्धा, खेळाडू आणि पायाभूत सुविधा ह्या सर्वांत क्रिकेट मागोमाग बॅडमिंटन आहे. हा खेळ इंदोर असल्याने पाऊस वर इत्यादींचा फरक त्याला पडत नाही आणि त्याच वेळी टेनिस किंवा फ़ुटबाँल प्रमाणे प्रचंड स्टॅमिना ह्या खेळाला लागतो. म्हणून उचभ्रु लोक, मॉडेल्स इत्यादी लोक सुद्धा हा खेळ खेळतात आणि त्यामुळे खेळाचे ग्लॅमर वाढते. प्रकाश पदुकोण ह्यांनी सुकन्या दीपिका पदुकोण आज अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असली तरी तिने सुद्दा एके काली बॅडमिंटन कोर्ट गाजवले आहे.

आज थिठिकाणी बॅडमिंटन कोर्ट्स असल्याने मध्यमवर्ग सुद्धा हा खेळ चांगल्या कोर्टवर खेळू शकतो नाहीतर मध्यमवर्गीय लोक बहुतेक वेळा जितेंद्रचे "ढल गया दिन, हो गयी शाम .. " ह्याच गाण्यात ह्या खेळाचा मजा घेत असे.