शालिमार प्रकरण सातवे : मर्डर
कैलासाला आज कामावर जायला खूप उशीर झाला होता. मुंबईत यावेळी पाऊस पडणे म्हणजे सगळी व्यवस्था ठप्प होणे. त्यांत राठोड साहेबानी संध्याकाळी एक महत्वाची मिटिंग बोलावली होती इथे उपस्थित राहणे आवश्यक होते. कैलासने स्वराला आपल्या बद्दल खूप माहिती दिली होती पण अजून शालिमारचा विषय आला नव्हता. आज नाही तर उद्या तो विषय सुद्धा येणार होता. कैलास मागील आठवडाभर ऑफिस मध्ये गेला नव्हता. पण आज काम चुकवणे शक्य नव्हते.
कैलास ऑफिस मध्ये पोचला तेंव्हा त्याच्यासाठी एक आश्चर्य होते. स्वरा ने ऑफिस मध्ये सर्वत्र कागदांचा बाजार मांडला होता. व्हाईट बोर्डवर खूप काही लिहिले होते. अनेक छायाचित्रे आणि वर्तमानपत्रांच्या कात्रणांचा खच पडला होता.
"हे काय आहे स्वरा ? नवीन केस होती तर मला नव्हते बोलवायचे ? " त्याने आपला कोट खुर्चीवर टाकत विचारले. पावसाने त्याचा कोट थोडा भिजला होता.
"नवीन केस नाही, this is some real serious police work, तुला ह्याची सवय नसेल कदाचित" तिने टोमणा मारला ".. मी मागील ३० वर्षांतील भ्रूणहत्या, अवयव तस्करी इत्यादी विषयी प्रत्येक केस आणि त्या संबंधित प्रत्येक बातमी मी गोळा केलीय. डॉक्टर लेले ३ वर्षे आधीच नर्सिंग होम मध्ये भरती झाले. त्यांना अल्झायमर झाला आहे त्यामुळे त्यांच्याशी बोलून फायदा नाही. मगनभाई चा दुवा दुर्दैवाने आम्ही वापरू शकत नाही. "
"पण त्याची गरज सुद्धा नाही ... I think we have what we need. Exahealth Corp नावाची एक अमेरिकन कंपनी होती. तिने भारतात ७० च्या दशकांत गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांचा वकील म्हणून प्रख्यात वकील राम गोयल ह्यांनी काम पहिले होते. Exahealth त्याकाळी स्टेम सेल मध्ये रिसर्च करायचा प्रयत्न करत होती आणि त्याकाळी हे क्षेत्र अतिशय नवीन होते. अमेरिकेत हा रिसर्च करणे जवळ जवळ अशक्य होते पण भारत आणि आफ्रिकेत अवैध पद्धतीने त्यांनी रिसर्च चालू केला होता.”
exacorp आता अस्तित्वांत नाही पण ह्या कंपनीने भारतात धुमाकूळ घातला त्याचे पुरावे जागो जागी सापडतात. पण मी फक्त इतकी माहिती मिळवून थांबले नाही. डॉक्टर लेले ह्यांच्याबरोबर लक्ष्मी नायर हि नर्स काम करत होती. मी तिला जाऊन भेटले. ती सध्या एका वृद्धाश्रमात आहे. तिने मला माहिती दिली कि भारतीय सैन्यातील एक अधिकारी अनेक वेळा लेले ह्यांना भेटायला येत असे आणि त्याच्याबरोबर कुणी तरी शुद्ध हिंदी बोलणारा एक सरकारी माणूस सुद्धा असायचा."
"wow ! आणि ह्या अधिकाऱ्याचे नाव ?" कैलासने विस्मयाने विचारले. स्वराने खरोखरच चांगला अभ्यास केला होता.
"ठाऊक नाही. नर्स लक्ष्मीने त्यांना फक्त कर्नल म्हणून संबोधित केलेले ऐकले होते. दुसरा जो सरकारी माणूस होता त्याचे नाव सुद्धा तिला ठाऊक नव्हते. लेले अनेक प्रकारची कामे करायचे त्यामुळे कधी पुलिस, मंत्री संत्री वगैरे त्यांना गुपचूप भेटायला यायचेच त्यामुळे लक्ष्मी ह्यांना त्याचे विशेष काही वाटले नाही. पण एक दिवस ह्या दोघांनी डॉक्टरना भेट दिली आणि तेंव्हा पासून डॉक्टर लेले ह्यांनी आपली प्रॅक्टिस बंद केली आणि नर्स लक्ष्मी ला भरपूर पैसे देऊन महाराष्ट्र सोडायला सांगितला"
"Fascinating" खरेच तू जबरदस्त काम केले आहे.
थोडक्यांत डॉक्टर लेले फक्त गर्भपात, किडनी चोरी इत्यादी करत नव्हते तर त्यांची पोहोच अगदी वर पर्यंत होती. एक्साकॉर्प, वकील गोयल आणि डॉक्टर लेले ह्यांच्या तिघांच्या संदर्भांत २ नावे मिळतात. कर्नल इक्बाल मुहम्मद आणि IAS ऑफिसर राजकुमार यादव. माझ्या मते नर्स लक्ष्मी हिने ह्याच लोकांना पहिले होते.
दोनी नवे ऐकून कैलास चमकला.
"तो ओळखतॊस दोघांना ? " स्वराने त्याचे भाव पाहून विचारले.
"होय." कैलासने आपला कोट काढून दुसऱ्या खुर्चीवर फेकला. एक कागदाचा गोळा करून बास्केट बोल जसा फेकतात तसा त्याने तो कचऱ्याच्या कुंडीत फेकला.
राजकुमार यादव हा एक नंबरचा हरामखोर सरकारी अधिकारी होता. जवळ जवळ प्रत्येक स्कॅण्डल मध्ये त्याचे हात बरबटले होते पण त्याच वेळी सरकारच्या अनेक घाणेरड्या प्रोजेक्ट मध्ये त्याची भूमिका फार महत्वाची होती . संजय गांधी चा कुप्रसिद्ध नसबंदी अभियानाचा तो म्होरख्या होता. आणीबाणीच्या काळांत त्याने अनेक कामे इंदिरा गांधी ह्यांच्या साठी केली. कर्नल इक्बाल हे वेगळे इसम होते. सरकारच्या कुठल्या तरी गुप्त अभियानात त्यांचा सहभाग होता. माझ्या माहिती प्रमाणे MI६ बरोबर त्यांचे काही तरी काम होते आणि हिमालयात तिबेट सीमेवर त्यांनी बराच काळ काम केले होते. काही वर्षे आधी त्यांची हत्या झाली. शिमला मधील एका हॉटेल मध्ये त्यांचे मृत शरीर सापडले.
"खुनी सापडला का ? "
"नाही. पण माझ्या माहिती प्रमाणे शिमला मध्ये हिमालयन climbers सलून नावाचा एक क्लब आहे. तिथे त्याने येणे जाणे असायचे. "
"पण हि माहिती तुला कशी ठाऊक आहे ? "
"स्वरा, आमच्या देशाचा सर्वांत मोठा शत्रू पाकिस्तान नाही, चीन नाही तर आमचे स्वतःचे सरकार आहे. ब्रिटिश लोक गेले आणि काळ्या साहेबाना दिल्लीचा ताबा देऊन गेले. आम्ही किती पारतंत्र्यात आहोत हे आम्हाला आज सुद्धा ठाऊक नाही पण सरकारी परवानगी शिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. ह्याच काळ्या सरकारच्या यंत्रणांचे अनेक भाग आहेत जे आज पर्यंत जनतेला ठाऊक नाहीत. मी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कर्नल इक्बाल हे ज्या अभियानात काम करत होते तिथे काही तरी लोक विरोधी काम चालले होते. कर्नल ला मनातून ते खात होते."
"मग ?"
"दिल्लीच्या एका कोपऱ्यातून एक मासिक चालते. `अफलातून` असे त्याचे नाव आहे. सत्यकथा, पोलिसात टाईम्स सारखया बी ग्रेड मॅगजीन्स प्रमाणेच एक. बलात्कार, खून, वेश्याव्यवसाय असल्या कथा. पण त्यांत अनेक प्रकारची पत्रे, जाहिराती सुद्धा येतात. अनेकदा हेर, अट्टल गुन्हेगार, सरकारी मोल्स आणि माझ्या सारखे वेडे त्यांत टोपण नावाने लिहीतात. विकिलिक्स चा जुलिअन असांज त्यात लिहतो आणि स्नोडेन ने सुद्धा त्यांत मदत मागितली होती. अफलातून मासिक बाजारांत विकत मिळत नाही. ते ठराविक लोकांकडून मिळवावे लागते. कर्नल आणि माझा पत्रव्यवहार तेथून झाला होता. आम्ही दोघांनी टोपण नावे वापरली होती. पण ज्यावेळी ते मला भेटणार होते तेंव्हाच त्यांचा खून झाला."
"पण तुमचा पत्र व्यवहार कोणत्या संदर्भांत होता ? "
"मर्डर. शिमला मध्ये एका स्कॉटिश मुलीचा खून झाला होता. माझ्या मते ती मुलगी MI६ चा भाग होती. हिमालयात काही तरी शोधायला आली होती. कर्नल ना तिच्या मृत्यू विषयी माहिती होती. माझ्या मते तिचा खून एका संघटनेशी संबंधित होता. अशी संघटना ज्याचे अस्तित्व कुणीच मान्य करत नाही. कर्नल कडे त्या संघटनेचे धागे दोरे होते. ते मला माहिती देणार होते."
"कोणती संघटना? "
"गॅम्बलर्स क्लब" हा क्लब शिमला कुठे तरी आहे जिथे अनेक मोठे लोक जुगार खेळायला मिळतात. कुठे आहे कुणालाही ठाऊक नाही. इथून मोठ्या मोठ्या उलाढाली होतात. मला तिथे प्रवेश हवा होता पण मला ते शक्य नाही झाले.
"तर हा क्लब आम्हाला मिळाला तर कर्णाचा मृत्यू आणि डॉक्टर लेले ह्यांचा संबंध समजू शकतो ? "
"होय. पण हे सत्य समोर येईल ते मेनी करण्याची तुझी तयारी असेल का स्वरा ?"
Truth is truth. I don't have an option.
"तर मग मला आजचा दिवस दे. मी शिमला गॅम्बलर्स क्लब ची माहिती आणतो. "
कैलासने कोट उचलला आणि तो निघाला. आज रात्री त्याला पुन्हा शालिमार मध्ये जायचे होते.