Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण पहिले : पार्टनर

कैलास कौल CBI मध्ये जेंव्हां पासून रुजू झाला तेंव्हापासून त्याचे नाव सर्वांच्या तोंडी होते. अत्यंत लहान वयातच त्याने इतक्या गुन्ह्याचा तपास केला होता कि प्रधानमंत्र्यांना सुद्धा त्याचे नाव ठाऊक होते. पण त्याच वेळी ह्या विचित्र ऑफिसर ने कित्येक प्रमोशने नाकारली होती. सरकारी गाड्यांतून फिरत रुबाब झाडण्यापेक्षा रस्त्यावर रात्री अपरात्री फिरून गुन्हे उकलण्यात कैलासाला मनापासून आनंद होता. पण ह्याच त्याच्या सवयीने त्याचे इतर सहकारी मात्र त्याला दचकून राहत. कुणी म्हणत असे कि कैलास खरे तर IB एजन्ट आहे तर कुणी म्हणत कि कैलास एक मनोविकृत आहे. कैलासाच्या ह्याच प्रवृत्तीवर नजर ठेवण्यासाठी त्याच्या वरिष्ठानी स्वरा नावाची नवीन स्त्री ऑफिसर त्याला पार्टनर म्हणून दिली. स्वरा खरे तर भ्रष्टचार विरोधी खात्यांत होती पण तिला इतर गुन्ह्यांत विशेष रस होता.

कैलासाला स्वरा आवडू लागली. म्हणजे त्या अर्थाने नाही. स्वरा अत्यंत अभ्यासू होती. कैलास प्रमाणे घिसडघाई ना करता ती व्यवस्थित प्लॅनींग करून निर्णय घ्यायची.  पण ती रस्त्यावर किती उपयुक्त ठरेल ह्याची कैलासाला शंकाच होती. रात्री अपरात्री कुठल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा ब्रिजच्या खाली काहीही घडू शकते. त्यावेळी ती कश्या प्रकारे वागेल ? ती स्त्री म्हणून कदाचित माझ्या साठी जोखीम तर ठरणार नाही ना ह्याची कैलास ला कधी कधी शंका वाटायची.

मुंबईतील पावसाचे दिवस होते. दादरच्या प्लॅटफॉर्म वरून एक ५ वर्षांची चिमुरडी कुणी तरी उचलून नेली होती. आईने धाय मोकलून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच परिसरांत आणखीन २ किडनेप झाले होते आणि दोन्ही घटनात ४-५ वर्षांच्या चिमुरड्याने उचलून नेले होते. प्रकरण CBI कडे नसले तरी लोकल पोलीस खात्यांत कैलासचा मित्रच इन्स्पेक्टर होता आणि त्याने कैलासाची मदत मागितली होती. अनेक इतर केसमध्ये कैलासने दादर परिसरांत काम केले होते आणि त्याचे अनेक खबरी त्या भागांत वावरत होते. त्याशिवाय गुन्हेगारांचे विविध अड्डे कैलासाला चांगलेच ठाऊक होते.

रात्रीचे ११ वाजले होते आणि कैलासने स्वराला फोन करून उठवले.  ती आपली लाल इंडिका घेऊन कैलासाच्या घरी आली आणि तिथून दोघेही दादरला गेले. सरिता अपार्टमेंट जवळ कैलास ने तिला गाडी पार्क करायला सांगितली. कैलास ने अपार्टमेंट च्या बिल्डिंग मध्ये प्रवेश केला. स्वरा सुद्धा चकित होऊन मागे मागे आली. तिला गप्प राहण्याची सूचना कैलासने केली होती आणि ती सुद्धा त्याचे पालन करायला तयार होती. कैलासाची कार्यपद्धती तिला आता बऱ्यापैकी ठाऊक होती. कधी कधी त्याचे हातखंडे पाहून ती चकित सुद्धा होत असे. ह्या आधी तो तिला अनेक चित्र विचित्र जागेवर घेऊन गेला होता. अश्या जागा कि ज्या अस्तित्वांत आहेत हे पोलिसांना सुद्धा ठाऊक नव्हते.

बाहेरून सर्वसाधारण वाटणाऱ्या त्या अपार्टमेंट मध्ये फ्लॅट ४०४ मात्र वेगळाच होता. आंत एखाद्या क्लब प्रमाणे वातावरण होते.. लालसर रंगाचे दिवे होते. कोपऱ्यांत फक्त ब्रा आणि पॅंटी घातल्या दोन तरुणी दारूच्या नशेत पडल्या होत्या. त्यांच्या आजूबाजूला बेढब असे पुरुष दारी पिऊन वाद घालत होते. कैलास सरळ आतल्या एका रूम मध्ये गेला. तिथे ४ टेबलवर पत्त्यांचा डाव मांडला होता. कैलासाला पाहून कुणीही चकित झाले नव्हते पण एका दोघांनी स्वाराला पाहून मात्र भुवया उंचावल्या. त्यांच्या नजरांनी ओशाळायला स्वरा काही अबला नरी नव्हती पण हि जागा म्हणजे जुगाराचा अड्डा आहे हे तिच्या लक्षांत आले.

कैलासने सरळ जाऊन काळ्या शर्ट मधल्या एका माणसाच्या खांद्यावर हात ठेवला. तो माणूस कैलासाला पाहून जराही आनंदित झाला नव्हता. उलट त्याला कैलासाची भीती वाटत होती हे स्पष्ट होते. कैलासने त्याच्या कानात काही तरी प्रश्न विचारला. हातातला डाव फोल्ड करून तो बाहेर रूम मध्ये आला. "हे किडनॅपिंग कोण करतोय हे खरेच मला माहित नाही साहेव, तो अदबीने बोलला". कैलासने पुढे मागे ना बघता त्याच्या कानावर एक जोरात लावू दिली. कोत्तापर्यंत पडलेल्या त्या दोघी मुली थोड्या गांगरून बसल्या. "पण लोकं बोलतायत कि ,,, " तो थोडा थांबून बोलला. "कि .. हे काम कुणी तरी नवशिख्याचे आहे". तो माणूस आता घाबरून कैलासकडे पाहत होता. स्वराने आपला हात आपल्या पर्सीत ठेवला होता, गरज पडली तर आपले गन काढायची तिची तयारी होती.

आवंढा गिळून त्या माणसाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. "काही दिवस आधी संगमेश्वर स्वीट मार्टच्या कचऱ्याच्या पेटीतून काही गरीब पोरांनी एक थैली उचलली होती. थैली डोगफ़ूड ची होती पण त्या मुलांना ती टॉफीची थैली असावी असे वाटले. ... " तो थांबला. कैलास आणि स्वरा दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते.

"त्या थैलींत एक हाड सापडले होते. ... ज्यांनी पहिले त्या पोरांच्या मते ते मानवी हाड होते आणि ते सुद्धा छोट्या मुलाचे. अस्लम भाईनी उगाच बोभाटा नको म्हणून मामला लपवला. हाड कुणीच पहिले नाही. पण काहींच्या मते किडनेप मुलाचे ते हाड असू शकते. पण खबर पक्की आहे असे आम्ही म्हणू शकत नाही. " कैलासने सगळे शांत पाने ऐकून घेतले आणि त्याची पाठ थोपटली. तो माणूस पुन्हा पट्टे खेळायला आंत गेला.

कैलास आणि स्वर पुन्हा गाडीत  बसले. स्वरा जरा सुद्धा टरकत  नाही हे पाहून कैलासाला आनंद वाटलं होता तर आंतील तो जुगाराचा अड्डा पाहून स्वरा विस्मयीत झाली होती. "काही लीड ? संगमेश्वर स्वीट मार्ट पाहूया का ?" तिने कैलासला विचारले. कैलासने मान हलवली. पण ह्याच माणसाला हि माहिती असेल हे तुला कसे ठाऊक होते ? तिने कैलासाला प्रश्न केला. "लहान मुलांचे किडनेप हा फार भयंकर प्रकार आहे. मुंबईतील मोठे मोठे गुन्हेगार सुद्धा असल्या विषयांना दूर ठेवतात. पण काही व्यक्ती अश्या आहेत ज्यांना हे असले शौक आहेत आणि असल्या शौकां साठी ते प्रचंड किंमत मोजतात. हा जो माणूस आहे ना तो ह्या भागांतील क्राईम रिपोर्टर आहे. पण पेपर मध्ये लिहितो तसाला नाही. हा लोकांची वर्में शोधून काढतो आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळतो. किडनेप झाल्यापासून हा त्यांच्या मागावर होता. त्यामुळे ह्याला जी माहिती आहे ती मी आधीच काढून घेतली." कैलासने आपली पद्धती स्पष्ट केली. "हे मुंबई शहर म्हणून मला थक्क करते" स्वराने संगमेश्वर स्वीट मार्ट पुढे गांधी थांबवत म्हटले.

स्वराचे म्हणणे होते कि त्या भागांतील सर्व CCTV च्या फुटेज पहिल्या तर कदाचित कुणी ती पिशवी त्या कचरा पेटित टाकली असावी हे समजेल. पण कैलासाचे म्हणणे होते कि ज्या अर्थी डोगफ़ूड च्या पिशवींत हाड सापडले होते त्या अर्थी त्याच्या मालक कडे कुत्रा असला पाहिजे. सर्व दुकानात चौकशी केली तर कोण कोण कुत्र्यांचे फूड घेऊन जातो हे समजेल. शेवटी दोघांनी आपापल्या परीने तपास करण्याचा निर्णय घेतला. जेंव्हा स्वरा गाडी फिरवत होती तेंव्हाच कैलासाला एक फुटपाथवर एक भिकारी नजरेस पडला. कैलासने गाडी थांबवायला सांगितली. तो त्या भिकाऱ्याजवळ गेला. एक ५० ची नोट त्याच्या हातावर ठेवताच तो खडबडून जागा झाला. कैलासने त्याला आधी चांगल्या शब्दांत आजू बाजूच्या कुत्रे मालकांना ओळखतॊस का असा प्रश्न केला. त्या भिकाऱ्याला आणि काही उमजले नाही पण स्वराने आणखीन एक ५० ची न देताच त्याने इथल्या कचरापेटीत कचरा टाकायला बाजूच्या च्या भंगारखाण्याचा मालक मंजू येतो असे सांगितले. त्याच्या मते मंजूने भंगार खाण्यात दोन मोठे कुत्रे सुद्धा ठेवले होते.

कैलास आणि स्वराने वेळ ना दवडता भंगारखान्याकडे धाव घेतली. वॉरंट वगैरे नसल्याने इथे पोलिसाना बोलवायचा वेळ नव्हताच त्या शिवाय लहान मुलांचे किडनेप असल्याने  एक एक मिनिट सुद्धा महत्वाचे होते. मंजुचा भंगारखाना हायवे च्या जवळ होता. मुख्य द्वारे बाहेरून कुलूप लावून बंद केले होते त्यामुळे आंत कदाचित कुणीच नव्हते. स्वराने कुंपण जिथे थोडे छोटे होते तिथे गाडी पार्क केली अनआणि गाडीच्या वर चालून तिने आंत उडी सुद्धा घेतली. कैलासने सुद्धा कुंपणावर चालून आंत प्रवेश केला.

दोघांनीही आपली बंदूक आणि टॉर्च बाहेर काढली. भंगारखान्यात नेहमीप्रमाणेच विविध गोष्टी पडल्या होता. पण आंत मध्यभागी एक खोली होती.  स्वरा आणि कैलासाच्या जागेने दोन कुत्रे भोलू लागले. कुत्रे नक्की कुठे होते हे त्यांना अजून दसत नव्हते. कैलासाने खोलीच्या दरवाज्यावर लाथ घालून आंत प्रवेश केला. कुत्र्यांच्या आवाजाने मंजू आंत असला तर सावध झालाच असावा असे त्यांना वाटले. पण आतील खोली रिकामी होती. कैलासने स्वराला बाहेर थांबायला सांगितले आणि त्याने खोलीत शोध घेण्याचा  प्रयत्न केला. एका कोपऱ्यांत एक ओटा होता आणि त्याच्या बाजूला पिंप भरून पाणी होते. ओट्याच्या बाजूला एक बास्केट होते. कैलासने आंत पाहतांच त्याला लहान मुलीचे कपडे दिसले. रक्ताने बंबाळ झालेले. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने ओट्यावर पहिले तर तिथे रक्ताचे काही डाग दिलेत होते. ओट्याच्या वर मास कापायला खाटीक वापरताततासली एक भली मोठी सूरी होती. त्याला सुद्धा रक्त लागले होते. कैलासने आणता खिडकीतून बाहेर पहिले खोलीच्या दुसऱ्या बाजूला दोन कुत्रे भुंकत होते. आणि कैलासने त्याच्यावर विजेरीचा उजेड टाकताच ते बंद झाले, विजेरीच्या उजेडांत कैलासाला कुत्रांच्या पुढे पडलेला मानवी हात दिसला. लहान मुलीचा हात. कैलासाला कंप सुटला. त्याच्या हृदयांत सुद्धा आता थोडी भीती दाटली होती.  कैलास वळणार इतक्यांत त्याच्या डोक्यावर आघात झाला. कंदिलाच्या डोळ्यापुढे अंधार आला. त्याला सावरायला काही क्षण लागले असतील पण एका माणसाचा विकलं चेहरा त्याला दिसला. त्याच्या हातांत फावडे होते.
कैलासाच्या हातातून बंदूक गाळून पडली होती आणि तो स्वतः खाली पडला होता. तो माणूस आता फावडे उचलून पुन्हा कैलासाच्या डोक्यावर हाणणार इतक्यानं बंदुकीचा आवाज त्या खोलीत घुमला. डोक्यावरच्या आघाताने कैलासाला आधीच काही ऐकू येत नव्हते पण तरी सुद्धा बंदुकीचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू आला त्याच बरोबर केसिंग उसळून त्याच्या दोंदावर पडले. तो फावडे घेतलेला माणूस आता जमिनीवर कोसळला. त्याच्या मागे स्वरा बंदूक घेऊन उभी होती. तिनेच तो बार झाडला होता आणि कैलासचे प्राण वाचवले होते.

स्वराने आयुष्यांत सर्वप्रथम जीव घेतला होता. ती घाबरून थरथरत होती. तशीच ती कैलास जवळ अली त्याचा बाजूला बसली. कैलास जखमी असल्याने उठू शकत नव्हता तर ती शॉकने उठू शकत नव्हती. बराच वेळ दोघेही तसेच निशब्द बसले होते. त्या माणसाच्या डोक्यांतून येणारे रक्त हळू हळू जमिनीवर पसरत होते. आपली पार्टनर खरोखर चांगली आहे ह्याची खात्री कैलासाला पटली होती.

- क्रमशः