Get it on Google Play
Download on the App Store

शालिमार प्रकरण चौथे : जन्नत हॉस्पिटल उत्तरार्ध

रात्रीचे ११ वाजले होते. कैलास CBI भवन मधील आपल्या ऑफिस आला. दिवे बंद असल्याने स्वरा अजून ऑफिस मध्ये अली नव्हती हे त्याला समजले. त्याने दिवा लावला आणि कॉफी मशीनवर कॉफी करण्यासाठी ठेवली. ५ मिनिटांतच स्वरा आली. नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिस सूट ऐवजी ती आपल्या सध्या जीन्स टीशर्ट मध्ये आली होती. कैलासाला तिचे हे रूप पहिल्यांदांच दिसत होते त्यामुळे तो थोडा भांबावून गेला. "काय झाले ? असा काय पाहतोस ? " तिने प्रश्न विचारला आणि तो भानावर आला. 

"इतक्या रात्री घाई घाईने बोलावण्याचे कारण काय आहे" तिने आपली पर्स आपल्या टेबलवर ठेवत विचारले. 

"जन्नत हॉस्पिटल ची केस अजून संपली नाही स्वरा."

"कैलास, त्या केस मध्ये तुझे अंदाज चुकले म्हणून तू अजूनही ती केस सोडायला तयार नाहीस ? कधी कधी आमचे सर्वांचेच अंदाज चुकतात. पण त्यांत इतके मनाला लावून घेण्याचे कारण नाही. पण तरी सुद्धा तुझ्याकडे काही खास पुरावे आहेत का ? कारण मला घरी जाऊन netflix वर स्ट्रेन्जर थिंग्स पाहायचे आहे" तिच्या आवाजांत समजूतदार पण होता. तीने एक पोझ घेतला. कदाचित तिला पुढील शब्द बोलायचे नव्हते पण तरी सुद्धा ती बोलली. 

"मी मुंबई पोलिसांच्या फॉरेंसिन्क विभागात आज संध्याकाळी जाऊन आले. कमलाबाईच्या शरीराची संपूर्ण टॉक्सिकोलॉजि करावी असा मी आग्रह धरला होता आणि त्यांनी तो केला सुद्धा. त्यांत त्यांच्या शरीरांत दक्षिण अमेरिकेत मिळणार्या एका विशिष्ट वनस्पतीतील विष सापडले. ह्या विषाची खासियत म्हणजे शरीरांतील साखरेचे प्रमाण अमुक इतके वाढले तरच ते विष घातक ठरते. डॉक्टर विशाखा ह्यांचा खून कसा झाला हे ठाऊक नाही पण डॉक्टर अली आणि डॉक्टर आपटे ह्यांच्या शरीरातून सुद्धा तेच विष मिळेल अशी माझी खात्री आहे." 

"well .. स्वरा .. त्या तीन डॉक्टर्सचा खून कसा झाला हा केस चा भाग १ आहे. तो तू कदाचित सोडवला असेलही पण त्या केसला भाग २ सुद्धा आहे." कैलास ने आता आपले बॅग उघडले आणि त्यातुन जुनाट वाटणारे एक स्केचपॅड काढले. 

"पहिली गोष्ट म्हणजे बादरायण संबंध लावून आम्हाला ह्या केस वर पाठवले गेले. सादिक हसन कुठल्याही केस मध्ये साक्षीदार नाही. मी सर्व माझे सर्व गुप्त सोर्सेस वापरून पहिले पण अशी कुठलीही केस नाही जिथे सादिक हसन साक्षीतदार म्हणून आहे. पण सादिकने कुणाला तरी फोन लावून हि केस आमच्याकडे द्यावी अशी विनंती केली होती. त्याच लोकांनी राठोड साहेबांवर दबाव टाकुनमहाला तिथे पाठवले" कैलास ने स्वराला आपला तर्क सांगितला. तिच्या चेहऱ्यावरील भाव अतिशय मक्खपणाचा होता. 

"पण कुणी असे का करेल ? आम्ही इतके महत्वाचे का आहोत ? ऐतिहासिक गुन्हे हा CBI मधील सर्वांत uneventful विभाग आहे. आम्ही एकही केस नाही सोडवली तरी कुणाला फरक पडत नाही" 

"हो, पण इतर संशोधका कडे जे ज्ञान नाही ते आमच्या कडे आहे त्यामुळे आमच्या नजरेला जे पडते ते इतरांच्या नजरेला दिसू शकत नाही" -  कैलास. 

"मग तुला काही दिसले का ? " स्वराचे कुतूहल आता थोडे जागृत झाले होते. 

"हो. खरेतर आम्ही त्या ३ डॉक्टर्स च्या खुनाचा तपास अगदी साधारण पणे केला. तिन्ही डॉक्टर्स ना त्या कमलाबाई नावाच्या महिलेने मारले असू शकते पण काही वैयक्तिक गोष्टी साठी नाही. त्या बदल्यांत तिच्या मुलीचा संपूर्ण खर्च कुणीतरी केला. चंद्रा काल पासून गायब आहे. तिने पोलिसांत जाऊन आपण स्वमर्जीने एका नातेवाईकाकडे जात असल्याचे सांगितले होते पण मी फोन लावून पहिला असता तो फोन दादर मधील एका बुक शॉप चा होता. मी तिथे गेलो तर तिने कैलास साठी एक पाकीट ठेवले होते. त्यांत तिने माझ्यासाठी तिच्या आईची आठवण, तो क्रिस्टल आणि चेन ठेवली होती."

स्वरा अवाक्क होती. तिने कोफी मशीन मधून आपल्यासाठी एक कॉफी कप घेतला. "तिला काहीही धोका नाही ह्याची तुला खात्री आहे का ?" स्वराने विचारले. 

"होय, ती स्वमर्जीनेच कुठे तरी गेली आहे." 

"पण मग हे खून कश्या साठी झाले ?" इति स्वरा. 

"कदाचित तुला हे ऐकून धक्का बसेल पण हे सर्व खून तुझे आणि माझे ध्यान त्या हॉस्पिटल बिल्डिंग कडे वेधावे ह्या एकमेव हेतूने झाले." 

हे ऐकून स्वराचे डोळे थोडे रुंदावले आणि तिच्या भुवया वर गेल्या. तिला विश्वास नव्हता ह्याचे ते द्योतक होते. 

"स्वरा .. ह्या केस वर आम्ही वेगळ्या दिशेने पहिले पाहिजे होते. त्या हॉस्पिटल मधील पेशंट कडे न पाहता आम्ही त्या कोठी ला जास्त बारकाईने पाहायला हवे होते. त्याचा इतिहास थोडा बारकाईने पाहायला हवा होता. "

"पण तू तिचा इतिहास मला सांगितला होता ना ? "

"हो पण एक महत्वाचा मुद्दा मी विसरलो. थॉमस फोर्ड ह्यांनी ह्या हवेलीत जेंव्हा आपले प्रयोग केले तेंव्हा त्यांनी असे सांगितले कि जेम्स नावाच्या एक भुताचा वावर त्या इमारतीत आहे" कैलास ने आपल्या हातातील जुनाट नोटबुक उघडून पहिले पण स्वराला दाखवले. जेम्स फेर्नांडीस. त्यावर ठळक पण सुंदर अक्षरांत लिहिले होते. हि जेम्स ची नोटबुक आहे. 

"भुताची नोटबुक ?" स्वरा 

"मी शोध घेतला आणि त्या हॉस्पिटलच्या बाजूलाच १९९८ मध्ये जेम्स चे मृत शरीर मिळाले होते. जेम्स चा खून झाला होता. पोलिसांच्या मते कुणी तरी त्याला लुबाडण्याचा प्रयत्न केला होता आणि झटापटींत त्याची हाय झाली होती. पण माझ्या मनातील पाल चुकचुकत होती. मी त्याच्या आईवडिलांचा पत्ता काढला. ते अंधेरीत राहतात. त्यांनी मला जेम्सची हि नोटबुक दिली. जेम्स वास्तुविशारद होण्यासाठी शिकत होता. त्याचा प्रोजेक्ट होता मुंबईतील जुनाट घरे. ह्या नोटबुक मध्ये अनेक स्केटचेस आहेत पणशेवटच्या पानात फक्त ह्या हवेलीची चित्रे आहेत. "

"very interesting" स्वराने पाने चाळत म्हटले. 

ती एका पानावर थांबली. कैलासाला तेच अपेक्षित होते. "yes you got it". त्याने म्हटले. स्वराने डोळे विस्फारून त्याच्याकडे पहिले. 

"इथे एक रूम असा आहे ज्यांत प्रवेश करण्यासाठी दरवाजा नाही. ह्याचे कारण काय असेल ? " तिने म्हटले. 

"जे काही कारण आहे ते शोधण्यासाठीच कुणी तरी आम्हाला तिथे पाठवले आहे." कैलास. 

"पण आम्ही रिपोर्ट फाईल करून केस मुंबई पोलिसांकडे पाठवली आहे. आता आम्ही पुन्हा सर्च वॉरंट नाही घेऊ शकत. " ती बोलत होती आणि कैलास मिश्किल पणे हसत होता. 

"पुन्हा एकदा वॉरंट शिवाय जायचे ? आम्ही सापडले गेलो तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ठाऊक आहे का ? "   स्वराचे शब्द वाया होते हे तिला सुद्धा ठाऊक होते. कैलासने आपला कोट आणि गन घेतले आणि दोघेही CBI भवनातून बाहेर पडले. 

विना ट्रॅफिक दीड तासांत ते जन्नत हॉस्पिटल जवळ पोचले. बाहेर वॉचमन झोपला होता. कैलास आणि स्वराने त्याला उठवले. तो दोघांना पोलीस म्हणून ओळखत होताच. त्याने त्यांना आंत जाण्यास अटकाव केला नाही. आम्हाला रात्रपाळीवरील एका डॉक्टर ला भेटायचे आहे अशी थाप कैलासने ठोकून दिली. 

जन्नत हॉस्पिटल म्हणजे एक जुन्या धाटणीची हवेली होती जिला हॉस्पिटलचा लूक देण्यात आला होता. आंत एके काळी एक विस्तीर्ण अंगण असावे जिथे सुद्धा आता खोल्या बनवल्या गेल्या होत्या. आंत शिरताच सर्वप्रथम उजव्या बाजूला लॉबी होती. तेथून सरळ चालत गेले कि कोपऱ्यात वर जाण्या साठी जिना होता. खरेतर ते जुन्या धाटणीचे दोन वेगवेगळे जिने होते आणि त्यांच्या मध्ये रिकामी जागा होती. पण जेम्सच्या स्केच मधील मेजरमेंट नुसार त्या रिकामी जागी जी भिंत होती त्याच्या मागे एक पोकळी होती. ती आणि जिन्याचा बाजूला असणारे दोनी रूम्स ह्यांची तुलना केलीय असता तिथे सुमारे ४x४ चार ची एक खोली असावी असा अंदाज होता. 

गाडीतून येताना स्वरा आणि कैलासने त्या खोलींत प्रवेश कसा मिळवायचा ह्यावर वाद घातला होता. भिंत फोडणे हे मुश्किल काम होते त्याशिवाय त्याचा आवाज बाहेर पर्यंत गेला असता. पण कैलासने तिला सांगितले होते कि त्याच्या कडे एक सोल्युशन आहे. कैलासने आधी खिशांतून एक यंत्र काढले. ते यंत्र म्हणजे कुठल्याही कुलुपाला उघडणारी एक विशिष्ट प्रकारची चावी होती. "कैलास हि चावी फक्त सिक्रेट एजंट्स ना मिळते ना ? " तिने विचारले. "हो पण चांगली ओळख असली तर लॅमिंग्टन रोड वर ३ हजार रुपयांत मिळते". काही क्षणातच त्याने स्टोर रूमचा चा दरवाजा उघडला. आंत औषधांचा तो कुबट वाज होता. औषधें, बॅंडेज इत्यादी गोष्टीचा खच पडला होता. उजव्या भिंतीला टेकून एक कपाट ठेवले होते. कैलास आणि स्वराने ते मोठ्या कष्टाने हलवले. त्यांना आधी त्यातील सर्व औषधें आणि सामान खाली ठेवावे लागले. 

नंतर कैलासने आपले बॅग उघडले. त्यातून एक यंत्र आले. "हे काय आहे ?" स्वराने आश्चर्याने विचारले. 

"हे सोनार आहे. ह्यामुळे भिंतींत नक्की कुठे भोक वगैरे आहे का हे समजते." कैलासाने नंतर यंत्र चालू केले. यंत्रावर दिसत होते कि भिंतीच्या एका भागाला एक फट होती. जेम्स ने भिंत फोडूनच आंत प्रवेश केला असेल. आणि कुणी तरी ती भीत नंतर बुजवली असेल. हे काम गुपचूप करायचे असेल तर प्लास्टर ऑफ पॅरिस, विटा इत्यादी सारखा कच्चा माळ वापरूनच ते बुजवाजे लागले असते. आणि तसेच होते.  सर्व भिंत अगदी चिरेबंदी असली तरी एक भागांत मात्र काही तरी वीक स्पॉट होता. कैलासने अंतर बॅग मधून आणखीन एक यंत्र काढले. ती के छोटी चेन सो होती. 

"ह्याचा आवाज येणार नाही ?" स्वराने विचारले. 

"नाही. जोपर्यंत आम्ही फक्त प्लास्टर ऑफ पॅरिस कापत आहोत तो पर्यंत नाही." त्याचे म्हणणे बरोबर होते पण स्वराने दरवाज्याच्या बाहेर नजर ठेवली. स्टोर रूम एअर टाईट होता त्यामुळे आधीच आवाज महेर कमीच जात होता. 

काही वेळाने स्पष्ट झाले कि एक प्लास्टरिंग च्या मागे फक्त काही विटा जोडून ठेवल्या होत्या. कैलासने एक जोरदार लाथ घातली आणि त्या आंत पडल्या. आंत खरेच एक भोक होते. स्वराने आपली विजेरी काढून आंत प्रकाश टाकला आणि कैलासाच्या मागोमाग ती सुद्धा आंत घुसली. आतील room खरेतर फार मोठा होता. कारण तो रूम फक्त room नसून एका तळघराकडे जाणारा रस्ता होता.म्हणजे त्या हवेलीला एक छोटे तळघर सुद्दा होते. 

धुळाने माखलेली कपाटे एक दोन टेबल्स आणि जुन्या धाटणीच्या खुर्च्या होत्या. रूम मधील सर्वच सामान अत्यंत जुने वाटले तरी सुद्धा आधुनिक काळांत सुद्धा तिथे कुणी आला असावा हे ह्या साठी स्पष्ठ होते कि कागदपत्रे इत्यादी प्लॅस्टीकच्या थैल्यांत ठेवली होती. दोघांकडे टॉर्च होता पण त्याच्या उजेडांत सर्व खोलीचे चित्र स्पष्ट दिसत नव्हते. "कैलास हे बघ" स्वराच्या आवाजांत विस्मय होता. कैलास तिच्या जवळ गेला. तिच्यापुढे जे शेल्फ होते तिथे ग्लासच्या बरणी होत्या. त्यांत मानवी भ्रूण ठेवले होते. कैलासाने आपल्या करियर मध्ये लोकांच्या अंगांत गोळ्या घुसताना पहिल्या होत्या, कित्येक लोक त्याच्या डोळ्यापुढे विव्हळून मृत्यूला कवटाळून गेलेले पहिले होते. पण इथे मानवी जीवनाची सुरुवात आणि अंत एकाच ठिकाणी होता. 

"कैलास this is evidence" स्वराने त्याच्याकडे पाहून म्हटले. टॉर्चच्या उजेडांत तिचा गोरा चेहरा लालबुंद दिसत होता. तिचा अर्थ कैलासला समजला. "नाही स्वरा आम्ही पोलिसांना इथे नाही बोलावू शकत. ह्या फाईल्स घेऊन आपण इथून पोबारा केला पाहिजे. " त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. 

"कैलास, मी तुझे खूप काही ऐकले पण येथील सगळे पुरावे आम्ही आता हलवले तर आम्ही एक क्रायम सिन डिस्टरब करत आहोत. हा गुन्हा तर आहेच पण अतिशय बे जबाबरदारपणा आहे. तुझ्या सारख्या अनुभवी ऑफिसरला हे माझ्यापेक्षा जास्त चांगले ठाऊक असायला हवे" स्वराने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तीचा विचार कैलासाला समाजत होता. 

"स्वरा तू पोलिसांना फोन केलास तर येथील एकही पुरावा पोलीस एव्हिडन्स रूम मध्ये पोचणार नाही. तिचे असे काही सापडले नाही असा अधिकारीक अहवाल वरून येईल आणि प्रकरण इथेच संपेल. आम्ही कायद्याचे रक्षक आहोत त्याला बांधून ठेवलेले एखादे कुत्रे नाही. आपण येथून फाईल्स घेऊन जाऊया आणि नंतर पोलिसांना फोन करूया. एकदा ह्या फाईल्स आमच्या कडे सुरक्षित राहिल्या कि नंतर मी बरोबर आहे कि नाही हे तूच पाहशील. " 

"पण आपले पोलीस इतके भ्रष्ट असतील असे मला वाटत नाही." तिने म्हटले. वेळ जात होता आणि त्यांना तेथून काढता पाय घेणे अतिशय आवश्यक होते हे तिलाही समजत होते. पण कैलासाचा आडमुठेपणा तिला समाजात नव्हता. 

"भ्रष्ट पोलीस ? नाही स्वरा. सरकार! हे  बघ. हे सरकारी डॉक्टर्स आहेत ज्यां १९७२ साली इथे गर्भपात घडवून आणले. हे त्यांचे रिपोर्ट्स आहेत. येथील गुन्हेगार आणखीन कुणी नसून आपलीच सरकारी यंत्रणा आहे ." त्याने कागद पुढे सरकवला. 

त्या कागदावर कुणा डॉक्टर कामत ह्यांची सही होती. ८ महिन्याचा गर्भाची ऑटोप्सी होती. त्यांत गर्भाची वाढ किती झाली आहे कुठले अवयव किती वाढले आहेत इत्यादी माहिती होती. 

स्वराने प्रश्नात्मक दृष्टिकोनाने कैलासकडे पहिले आणि घाईघाईने तिने इतर थैल्या हातांत घेतल्या. तो सांगत होत्या त्यावर तिचा विश्वास नसला तरी काही तरी पाणी मुरतेय हे तिला पटत होते. कैलास आणि स्वरा त्या भिंतीच्या क्षिद्रांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तेंव्हाच त्यांना बाहेर काही तरी गडबड आहे हे लक्षांत आले. 

"स्वरा पोलीस !" कैलासने स्टोर रूमच्या बाहेर डोकावत म्हटले. महाराष्ट्र पोलीसांचे अनेक लोक पळत आंत येत होते. 

"त्यांत घाबरायचे काय ? आम्ही CBI आहोत. ID दाखवून बाहेर पडू शकतो." स्वराने कैलास ना म्हटले. 

"ट्रस्ट मी हिअर, इथे आम्ही पकडलो गेलो तर हि सर्व कागदपत्रे आपल्या हातातून जातील "

"तू पकडला गेलास तर." स्वराने आपल्या हातातील बॅग त्याच्या हातांत दिली. तिने दार लोटून दिले आणि ती बाहेर पडली. तिला पाहातांत बाहेर एकाच गोंधळ उडाला. दोघे तिघे हवालदार आपल्या जुनाट ३०३ रायफल्स तिच्यावर रोखून पुढे आले. सर्वांची लक्ष्य तिच्याकडे असताना कैलासने हळूच संधी साधून दारातून बाहेर प्रवेश केला. त्याच्या दुर्दैवाने कुणी तरी त्याला पहिले. कैलास वेगाने लॉबी मधून पळत बाहेर गेला. काही हवालदार त्याच्या मागे धावले असतील पण त्याने मागे  न पाहता धूम ठोकली. त्याला बिल्डिंग ची संपूर्ण ब्लु प्रिंट पाठ होती त्यामुळे बिल्डिंगचा मागील दरवाजा सुद्धा ठाऊक होता. वाटेत आलेल्या एका शिपायाला कैलासने धक्का दिला आणि मागच्या दरवाज्यातून तो बाहेर पडला. 

त्याची गाडी हॉस्पिटलच्या पुढे पार्क केली होती आणि त्यावर पोलिसांनी कब्जा केला असेलच. जन्नत हॉस्पिटलच्या मागे होता एक नाला. नाल्याच्या आजूबाजूला छोटी घरे. तेथील बारीक गल्ली बोळांतून कैलास पळत गेला पोलीस त्याच्या मागे होते कि नव्हते त्याला ठाऊक नव्हते पण त्यांच्यापासून दूर जाणे त्याचे प्रमुख लक्ष्य होते. मुंबई पोलिसांनी एका CBI ऑफिसरला चोरी करताना पकडले हि बातमी उद्याच्या पेपर मध्ये झळकली असती. पण शेवटी त्या गल्ली बोळांतून कैलासाला बाहेरील रस्ता दिसला. 

कैलास बाहेर रस्त्यावर आला आणि एक छोटीशी अल्टो गाडी त्याच्यापुढे येऊन थांबली. कैलासने आंत पहिले. आतील माणूस ओळखीचा नव्हता. 

"कैलास ... आंत ये "त्याने चालकाच्या बाजूचे दार उघडले. 

कैलासकडे आणखीन पर्याय नव्हता त्याने गाडींत प्रवेश केला. 

"आपण कोण आहात ? " कैलासने पेपरवाली बॅग घट्ट पकडत त्याला विचारले. 

"आमची ओळख घेऊन तो काय करणार आहेस कैलास ? तुझ्यावर आमची बारीक नजर आहे. तुला ज्या मार्गावर आहेस त्या मार्गावर तू चालू नये असे आमच्यापैके अनेकांना वाटते पण माझ्या मते तू फार हुशार आहेस. हि हुशारी तुला घेऊन बुडण्यापूर्वी तू थोडा जास्त विचार करावास असे मला वाटते." तो मनू गाडी हाकत बोलत होता. त्याचे वय किमान ६५ तरी असावे. उंची प्रचंड होती आणि त्याचे डोके जवळ जवळ ऑटोच्या छताला टेकत होते. डाव्या हातांत जुन्याकाळी लोक घालायचे त्या प्रकारचे घड्याळ होते आणि शर्ट पेंट अगदी ब्रॅण्डेड वाटत होते. पोलीस ? RAW ? कैलास विचार करत होता. मागच्या वेळी सफायर ऑक्शन मध्ये सुद्धा त्याच्यावर कुणी नजर ठेवून आहे असे त्या युवतीने सांगितले होते. शालिमार च्या गूढांत आणखीन नवीन मिस्टरी समोर येत होती. 

काही वेळाने अल्टो गाडी एका कचऱयाच्या ढिगाकडे येऊन थांबली. तिथे एक भिकार उकिरड्यातून काही तरी शोधत होता. कैलासने चालकाकडे पहिले. छळाच्या हातांत आता स्मिथ आणि वेसन रिव्हॉल्वर होते. "कैलास.. I am sorry. हि सर्व कागद पत्रे इथेच राहतील पण तू आणि तुझी पार्टनर इथून जिवंत राहतील. कागद मागे ठेव आणि गाडीतून उतर"  त्याच्या आवाजांत इतकी शांतता होती कि तो ट्रिगर ओढील ह्यांत कैलासाला अजिबात शंका वाटली नाही. आजवरच्या नौभावांत मृत्यूला पाहताच त्याला ओळखण्याची क्षमता त्यांच्यांत आली होती. आपले बॅग त्याने नाईलाजाने आणि आंतून धुमसत त्या गाडीत ठेवले. अल्टो गाडी त्यांत भरधाव वेगाने पुढे गेली. 

कैलास ऑफिस मध्ये पोचला तेंव्हा स्वरा आधीपासूनच तिथे होती. तिच्याबरोबर राठोड साहेब चिंताग्रस्त चेहऱ्याने बसले होते. पण कैलास कडे पाहतांच दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला. "थँक गॉड" राठोड साहेबानी म्हटले. "काय झाले ?" त्याने प्रश्नात्मक दृष्टीने दोघांकडे पहिले. 

"कैलास .. काही तासापूर्वी जन्नत हॉस्पिटल ला आग लागली आणि सर्व हॉस्पिटल आणि त्यातील सर्व सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाने त्याला अपघात करार दिल आहे. " स्वराने माहिती दिली. 

"आणि मी त्या आगीत सापडलो असे तुम्हाला वाटले का ? " कैलासने विचारले. 

"मुंबई पोलिसांच्या रिपोर्ट मध्ये दोन CBI ऑफिसर नी बेकायदेशीर पद्धतीने बिल्डिंग मध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे आग लागली असे त्यांनी लिहिले होते. मला दिल्ली पर्यंत फोन करून तो रिपोर्ट बदलावा लागला. तुम्ही दोघे तिथे नक्की का गेला होतात हे रिपोर्ट मध्ये मला लिहून उद्या पाहिजे. तेंव्हा विचार पूर्वक लिहा " राठोड साहेबानी कैलासाला डाँ दिला आणि ते तावातावाने बाहेर गेले. सकाळचे ५ वाजायला आले होते आणि कैलासाची राहिलेली कथा ऐकून स्वरा सुद्धा सुन्न झाली. 

"Goddamn कैलास ! एक काम तरी ठीक करायला पाहिजे होते. मी नसते तर एकही कागद तुला मिळाला नसता " स्वराने आपला फोन काढला. फोनवर तिने काही कागदांचे फोटो घेतले होते. 

"तू कुणाला सांगितले तर नाहीस ना ?" त्याने तिला विचारले. 

"नाही राठोड साहेब काहीही ऐकण्याच्या मनस्तिथीत नव्हते आणि मुंबई पोलिसांनी माझी पर्स वगैरे शोधली पण फोन नाही शोधला. ह्या हॉस्पिटल ला आग लावण्यात आली आणि ह्यात आपले सरकार किंवा सरकारातील काही लोक शामिल आहेत असे मला सुद्धा वाटतेय. सरकारी डॉक्टर्सनी ह्या हॉस्पिटलांत खूप वर्षां आधी अनेक गर्भपात घडवून आणलेच पण त्या गर्भांच्या डिटेल ऑटोप्सी सुद्धा केल्यात. माझ्या माहिती प्रमाणे देशांत असे प्रयोग उघड पणे कधीही केले गेलं नव्हते. फक्त वैद्यकीय दृष्टिकोनातून इतका डेटा कुठल्याही जर्नल साठी फार महत्वपूर्ण ठरला असता पण त्या बद्दल काहीही माहिती नाही. ह्यावर ज्या डॉक्टर्स चिरे नवे आहेत त्यांची सुद्धा फाईल आमच्या कडे नाही."  

"इथे नक्की काय चाललेय कैलास ?" स्वराने त्याला विचारले. 

कैलास फार थकला होता. शरीराने आणि मनाने सुद्धा. त्याला आज त्या अनोळखी माणसाने मात दिली होती. त्या कागदांच्या ढिगाऱ्यांत मुंबईत कार्यरत असणाऱ्या एका मोठ्या अंडरवल्र्ड चे पुरावे सर्वप्रथम त्याला मिळाले असते. पण उजवी बाजू म्हणजे त्याची थट्टा उडवणारी स्वरा आज त्याचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार होती.