शालिमार प्रकरण सहावे : काश्मीर
स्वराने आज कैलासाला घरी बोलावले होते. त्याच्यासाठी हे अनपेक्षित होते. तिच्या घरी येताच त्याच्या लक्षांत आले कि त्याची पार्टनर जिने त्याचा जीव वाचवला होता. जी त्याचा केले पाऊल पुढे राहायचा प्रयत्न करीत होती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्याला जवळ जवळ शून्य माहिती होती. स्वराला खरे तर कैलासावर बारीक नजर ठेवायला वरिष्ठानी पाठवले होते; पण कैलासाच्या हृदयांत जी एक प्रकारची खिन्नता होती आणि एक प्रकारचा गंभीर काळोख होता तिच्यांत कुठे तरी ती गुंतली गेली होती. कैलासाला सुद्धा ते जाणवले होते इतरांच्या इशाऱ्यावर नाचणारी ती नसून एक अतिशय कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अशी ऑफिसर आहे.
"You will get the most attention from those who hate you. No friend, no admirer and no partner will flatter you with as much curiosity." -निस्सीम तालेब
स्वराचा फ्लॅट हिरानंदनीतील अतिशय उचभ्रु वस्तीत होता. सोळाव्या मजल्यावर तिच्या प्रशस्त फ्लॅट मध्ये शिरतानाच पुढे केलेंडर वर वरील वाक्य कैलासाच्या दृष्टीस पडले. किती खरे होते ते ? कैलासाच्या बाबतीत तरी ते १०० टक्के खरे होते. स्वरावर त्याने विश्वास ठेवला होता. CBI मधील वरिष्ठानी वाईट हेतूने तिला पाठवले असले तरी कैलासने तिचा इतिहास, केस फाईल्स अभ्यासल्या होत्या. स्वरा अत्यंत प्रामाणिक होती. तिची शोधपद्धती एखाद्या वैज्ञानिकाप्रमाणे होती. "सत्य" काय आहे हे शोधणे तिला इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा महत्वाचे वाटत होते. आणि त्यामुळेच कैलासाला तिच्यावर विश्वास होता. कैलासाची पद्धत वेगळी असली तरी स्वर मध्ये त्याला एक प्रकारची शांतता भेटत होती.
"तू एकटी राहतेस ? " कैलासने ओशाळून तिला विचारले. आपण तिला कधीही तिच्या फॅमिली बद्दल विचारले नाही हे त्याला वाईट वाटत होते. त्याने होती, तिला आई होती वडील एका अपघातांत वारले इत्यादी माहिती त्याला त्यांनी कधीही तिला त्याबद्दल प्रश्न विचारले नव्हते.
"हो. माझी आई कधी कधी येते इथे राहायला. पण बहुतेक वेळी मी एकटीच असते." तिने फ्रिज मधून एक बियर काढत सांगितले. तिच्या पगाराच्या मानाने ती जास्तच उचभ्रु लोकवस्तीत राहत होती. नटराजाची प्रचंड मूर्ती गैलरी च्या बाजूला होती. तिथे ठेवलेल्या दोन अमरखुर्चीवर ते विसावले. स्वरा अगदी मनमोकळेपणाने पाय वर ठेवून बसली होती. नेहमी प्रमाणे कपाटांतील बाहुली प्रमाणे व्यवस्थतीत दिसता विस्कटलेले केस नाईट ड्रेस मध्ये ती एखाद्या खोडसाळ शाळकरी मुली प्रमाणे भासत होती.
"तर स्वरा, अजेन्डा काय आहे ? माझ्यावर भाळून तू मला काही प्रपोस करण्यासाठी बोलावले नाहीस ना ? " त्याने खट्याळ पणे तिला विचारले.
"कैलास, CBI मॅन्युअल प्रमाणे महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केलेल्या अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ शकते "तिने उत्तर दिले. दोघेही मनमुराद हसले आणि नंतर रम मध्ये गाम्भीर्य पसरले.
"इथे अश्यासाठी बोलावले कि मला खूप महत्वाचे बोलायचे होते. आम्ही बाहेर असलो कि नेहमी काही ना काही केस मध्ये गुंतलो असतो आणि काही विषय बाहेर बोलले जाऊ शकत नाहीत"
"कैलास, मला तुझी पार्टनर म्हणून नेमले तेंव्हा मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक विशेष मिशन दिले होते. ऑर्डर्स म्हणे दिल्ली पासून होत्या. मी तुझ्यावर बारीक नजर ठेवावी आणि तुला नोकरीतून बेइज्जत करून काढून टाकता येईल असा एखादा पुरावा गोळा करावा असे मला अनऑफिशिअल आदेश होते. मी भ्रष्टचार विरोधी पथकांत असल्याने कैलास कदाचित लाँच वगैरे घेत असावा असे मला त्यावेळी वाटले. तुझी कार्यपद्धती आणि अजब वेगाने केसेस सोडवण्याची कार्यक्षमता ठाऊक होती पण तरीसुद्धा मी तुझ्यावर संशय ठेवूनच हि केस हाती घेतली".
ती बोलत होती आणि कैलास ऐकत होता. कुठेतरी त्याच्या हृदयांत समाधान होते. स्वराच्या जागी जर आणखीन कोणी असता तर त्याने प्रत्येक ठिकाणी कैलासाला अडथळे निर्माण केले असते पण ती समजूतदार होती.
"स्वरा, मला ते ठाऊक होते. मला CBI मधून बाहेर काढण्यासाठी अनेक लोक प्रयत्नरत आहेत. आणि त्यांनी मला काढले म्हणून मला फरक पडत नाही. CBI माझ्यासाठी निव्वळ एक साधन आहेमी गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि त्यांच्या मुळाशी जाण्यासाठी. तू माझ्यावर नजर ठेवायला अली असलीस तरी मी काही माझा स्वभाव बदलला नाही आणि एखाद्या पार्टनर कडून ज्या अपेक्षा त्याच ठेवल्या आणि तू सुद्धा आपले कर्तव्य अतिशय छान पणे निभावले. तू हे सांगितलेस म्हणून मला आनंद आहे पण त्यामुळे मी तुझ्याकडे ज्या आदराने आणि विश्वासाने पाहतो त्यांत काहीही फरक पडलेला नाही. "कैलासने बिअर चा घुटका घेत म्हटले.
"हो पण मी ते सांगण्यासाठी तुला नाही बोलावले. आम्ही बरोबर काम करताना तू अनेकदा कायदा मोडलास. सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवलेस. तुझे उठणे बसने गुन्हेगार, स्मग्लर्स, गॅंगस्टर्स अश्या मंडळीत आहे. हे सर्व माझ्यासाठी फार अनपेक्षित आहे. तुझ्या बरोबर काम करताना मला मानवी स्वभावाचे अशे कंगोरे कुठेही पुस्तकांत लिहिलेले नसतात. सफायर ऑक्शन काय किंवा जन्नत हॉस्पिटल काय इथे सर्वत्र वर वर एखादी केस आम्ही सॉल्व करत असलो तरी तुझ्या म्हणत काही तरी वेगळी केस आहे असे मला राहून राहून वाटत आले आहे. आमच्या मध्ये विश्वास राहावा तर मला ते नक्की काय आहे हे समजणे आवश्यक आहे नाही तर गाडीच्या मागे धावणाऱ्या कुत्र्या प्रमाणे माझी अवस्था होईल. " तिने कैलासाला तो प्रश विचारला कैलासकडे तयार नव्हते.
"स्वरा मी तुला सर्व काही सांगू शकतो पण त्यासाठी तू ओपन मायंडेड असायला हवीस" त्याने तिचे हावभाव न्याहाळले.
"try me " स्वराने म्हटले.
"माझे आडनाव कौल ह्यावरून तू मी काश्मिरी पंडित आहे हे जाणले असेलच. ९०च्या दशकात जेंव्हा काश्मिरी पंडितांविरुद्ध काश्मीर खोऱ्यांत हिंसाचार मजला तेंव्हा मी त्याचा बाली ठरलो. पण माझी स्थिती इतर काश्मिरी पंडित प्रमाणे नव्हती. माझी आई यशोदा मी आणि माझी छोटी बहीण निरुपमा काश्मीर खोऱ्यांतील एका प्रशस्त बंगाल्यांत राहायचो. आमचा एक नेपाळी नोकर होता शिवा." कैलास भूतकाळांत गुंतला होता. एखादी जुनी जखम पुन्हा उघडी व्हावी तशी त्याची अवस्था होती.
"आणि वडील ? " स्वराने विचारले.
"माझे वडील भारतीय वायुदलात होते आणि ते मारले गेले असे माँ सांगायची. नोकर शिव सुद्धा तेच सांगायचा. पण घरी त्यांचा एक फोटो सुद्धा नव्हता. माझी माँ आणि माझे वडील ह्यांचे संबंध नक्की कसे होते मला खरेच त्यावेळी कळले नाही आणि माँ सांगायची कि मी मोठा झालयावर ती मला सर्व विस्तृत पाणे सांगेल. पण मी माझ्या वडिलांचा अभिमान ठेवावा असेच ती नेहमी सांगत असे"
ज्यावेळी हिंसाचाराची बातमी अली त्यावेळी माँ आणि निरुपमा काश्मीर मध्ये नव्हत्या. त्यांना दिल्लीला जायचे होते. ती ज्या दिवस येणार त्या दिवशी मी अतिशय आतुरतेने तिची वाट पाहत बसलो होतो. इतक्यांत शेजारी करीम खान म्हणून शिंपी राहायचा त्याने दबक्या पायानी येत शिवाला काही तरी सांगितले. शिवा सरळ आपल्या रम मध्ये गेला आणि त्याने एक शॉटगन आणली आणि भरपूर काडतुसे. तो माझा हात घेऊन मागील दारातून पळाला. वाटेवर आम्हाला एक जमाव भेटला. मी भेदरून गेलो होतो. त्यांच्या हातांत सुद्धा बंदुका आणि तलवारी होत्या शिवाने इतक्या सफाईने बंदूकधार्यांना मारले ते पाहून मी गर्भगळीत झालो. इतक्या चपळतेने बंदूक वापरताना मी कुणालाही पहिले नव्हते. त्याच्या गोळीबाराने जमाव पांगला आणि आम्ही पळत जंगलाच्या दिशेने पळालो. दुरून कोणी तर रायफल ची गोळी झाडली जी शिवाच्या पोटरीत गेली पण तो पळत राहिला. त्याला सर्व वाट ठाऊक होत्या. एक ठिकाणी अतिशय कठीण अशी चढाई होती. तिथे तो अगदी माकडा प्रमाणे वर चढला आणि नंतर दोरी टाकून त्याने मला वर घेतले. त्यानंतर आम्ही सुरक्षित होतो. आमच्या बंगल्याला लागलेली आग दुरून स्पष्ट दिसत होती. त्या घराबरोबर माझे बालपण सुद्धा खाक झाले होते"
"जखमी शिव आणि मी चालत एक गुराख्यांच्या गांवात पोचलो. शिवाला तिथे सर्वजण ओळखत होते. ते गुराखी महाकाळाचे भक्त होते. त्यांनी शिवाच्या जखमेवर उपचार केले. आमच्यावर ज्या लोकांनी हल्ला केला त्यातील अनेकांना मी ओळखत होतो. काही मुलांबरोबर मी क्रिकेट सुद्धा खेळलो होतो. त्यांनी मला मारायचा प्रयत्न केला ? मला ते खरेच धक्कादायक होते. हिंदू मुसलमान ह्यांच्यातील दंगे आणि भेदभाव हे सर्व मला ठाऊक होते पण माझ्या जीवाची किंमत इतकी कधी कमी होईल असे वाटले नव्हते. "
"मला माँ आणि निरूपामची चिंता होती पण शिवाने मला सांगितले होते कि माँ स्वतःची आणि निरूपामची काळजी घ्यायला समर्थ आहे. मी त्यांची चिंता सोडून द्यावी आणि स्वतःचा जीव वाचवण्याला प्राध्यान्य द्यावे. नंतर त्याने मला काही कथा सांगितल्या त्यानंतर मला सुद्धा ते पटले" - कैलास
"कसल्या कथा ?" - स्वरा
"शिव काही साधारण नोकर नव्हता. तो गोरखा रेजिमेन्ट मधील सैनिक होता. माझे वडील भारतीय वायुदलात पायलट म्हणून मेले नव्हते तर ते एक गुप्त मिशनवर होते आणि ते जिवंत होते कि नाही कुणालाच ठाऊक नव्हते. माँ यशोदा माझी खरी आई नसून बालपणापासून माझे आणि निरूपामचे पालन पोषण करण्यासाठी ठेवलेली ती सुद्धा एक गुप्तचर होती. शिवाच्या मते माझ्या आणि निरूपमच्या जीवाला धोका होता आणि आमच्या वडिलांनी आमच्या सुरक्षेसाठी हि सगळी योजना केली होती. ".
"That sounds incredible Kailas. Must have been difficult for you as a child to take that all”
"हो, माझ्यासाठी तो आधी एक धक्का होता. माँ IB ची एजन्ट होती आणि कागदोपत्री तिचा मृत्यू झाला होता पण खरे तर दुसरी ओळख घेऊन ती आमचे संगोपन करत होती. शिवाला माझे वडील नक्की कोणत्या मिशनवर आहेत हे ठाऊक नव्हते पण त्याच्या मते आम्हाला सर्वांत मोठा धोका भारतीय सरकारपासून होता." कैलास स्वराला समजावून सांगत होता. त्याचे हावभाव पाहून स्वराला सुद्धा त्याच्यावर विश्वास वाटत होता.
"तुझे वडील डबल एजन्ट होते ?" स्वराने विचारले.
"माझे वडील देशद्रोही होते का ? हेच विचारायचे आहे ना तुला ?" कैलासाने स्मित देत तिला विचारले. ती थोडीशी ओशाळली आणि तिने नजर चुकवली.
"पण इथेच सर्व प्रकरण कॉम्प्लिकेटेड होते. शिवाच्या मते माझे वडील ज्या कामांत गुंतले होते तिथे त्यांच्या हाती फार मोठे धागेदोरे लागले, शिवाच्या मते माझ्या वडिलांना हि माहिती कुणालाही द्यायची नव्हती आणि त्यांना स्वतः तपास करायचा होता. शिवाला म्हणून काहीही माहिती नसली तरी माझे वडील हे अत्यंत कर्तव्यदक्ष होते असे त्याचे म्हणणे होते. निव्वळ माझ्या वडिलावरील प्रेमा साठी माँ आणि शिवा आम्हा दोघांवर नजर ठेवून होते. एका देशद्रोही माणसासाठी कुणीही आपले आयुष्य धोक्यांत घालत नाही."
"पण कैलास मग तुझी खरी आई कोण होती ?" स्वराने विचारले.
कैलासाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. "That is all this has been about ! स्वरा". त्या दिवसापासून आज पर्यंत कैलास कौलचा एकाच उद्देश राहिला आहे. माझे वडील, आई आणि निरुपमा चा शोध घेणे. वडील ज्या गोष्टीवर तपास करत होते ते पूर्ण करणे. "
काही क्षण त्या रम मध्ये विलक्षण शांतता पसरली. स्वरा आणि कैलासाने बियर चे शेवटचे घोट घेतले. नंतर कैलासनेच शांततेचा भंग केला.
"त्यांनतर मी शिक्षण सोडून दिले. शिव सुद्धा मिलिटरी इंटेलिजन्स मध्ये असल्याने त्याला अनेक गोष्टी ठाऊक होत्या. वेष बदलणे, शत्रूच्या गोटांत प्रवेश करणे आणि पाहिजे तर शस्त्र प्रयोग करणे त्याला सर्व काही ठाऊक होते. आम्ही मुस्लिम वेष धारण केला. काश्मीर खोऱ्यांत आम्ही भटकलो, चोरी करून पोट भरले. जाम मशिदींत जाऊन नमाज पढला. कश्मिर खोऱ्यांत अशांतता पसरवणाऱ्या गटांत शिवाने प्रवेश मिळवला आणि मी सुद्धा मदरश्यांत धडे घेतले. काश्मीर खोऱ्यांतील भारतीय गुप्तचर, पाकिस्तानी गुप्तचर सर्वांची आम्ही माहिती घेतली"
"एक चांगला गुप्तचर सहज पाने सभोवतालच्या वातावरणात मिसळून जातो. तो कुणाशीही मैत्री करू शकतो आणि प्रत्येकजण त्याला आपला मित्र समजतो. शिवाला जास्त रनिंग नव्हते पण तो फार हुशार होता. अनेक गोष्टी त्याने स्वतः आत्मसात केल्या होत्या दुसऱ्या माणसाच्या जागी स्वतःला तेहवून त्या दृष्टीने विचार करायला त्याने मला शिकवले. काश्मीर मधील भारतीय सैन्याची काही सेफ हाऊसेस होती तिथे आम्ही तोतया रूप धारण करून राहिलो. गणित पासून भूगोल पर्यंत सव विषय मी स्वतः शिकलो. "
"मग तू दहावीची वगैरे परीक्षा कशी दिलीस ?" स्वराने विचारले.
कैलास मोठ्याने हसला "शिवाने CBSE ऑफिसमध्ये प्रवेश करून सर्व रिकॉर्डस निर्माण केले. नंतर मी जाऊन परीक्षा दिली आणि संपूर्ण देशांत मी ३ रा आलो."
"स्वरा, मानवी स्वभाव म्हणजे एक कोडे आहे. ते कसे सोडवावे हे मी स्वतः शिकलो. तेंव्हा मला लक्षांत आले माणूस प्राणी जसा वाटतो तसा असत नाही. मीडिया मध्ये ज्या बातम्या येतात त्या क्वचित खऱ्या असतात. काश्मीर खोऱ्यांत हिंदूना पळवून लावणारे मुस्लिम जमाव अगदीच धर्मांध जनावरे नव्हती. त्यात १५-१६ वर्षांची पोरे निव्वळ मजा म्हणून सहभागी झाली होती. काही लोक इस्लाम च्या शिकवणीमुळे आले होते तर काही लोक विदेशी शक्तीचे पैसे घेऊन आले होते. काश्मीरी पंडितांच्या शिरकाणात निव्वळ धर्मद्वेष नव्हता तर मानवी स्वभावाचे अनेक पैलू पुढे आले होते. मला ते सर्व समजायचे होते. म्हणून मी इस्लामिक दहशतवादाचा जवळून अनुभव घेतला. मग मला लक्षांत आले कि इस्लामिक दहशतवाद आणि इतर सर्व प्रकारचे गुन्हे ह्यांच्यांत घनिष्ट संबंध आहे. जे लोक वेश्यावृत्ती साठी मुलींना बॉर्डर पार चोरून घेऊन जाताच तेच लोक हत्यारे आणू शकतात. जिथे सामान्य हवालदार भ्रष्ट असतो तिथे BSF चे सैनिक सुद्धा भ्रष्ट असतात. भ्रष्ट आणि गुन्हेगारीचे जग आपले एक जग आहे आमच्या सामान्य जगापासून वेगळे पण अतिशय विलक्षण. मी त्यांत ओढले गेलो. गुन्हेगार म्हणून नाही तर एक संशोधक म्हणून. "
"ज्या वेळी मुले शाळा कॉलेज मध्ये होती तेंव्हा मी गँग्स आणि स्मग्लर्स मध्ये व्यस्त होतो. मुंबईतील गॅंग वॉर्स, बिहार मधील कोळसा गँग्स, कर्नाटकातील चंदन तस्कर, माओवादी, नागा बंडखोर, कोलकातातील कुंटणखाने मी सगळी कडे फिरलो. मी सगळीकडे काम केले. दोस्त बनवले शत्रू बनवले. CBI अकॅडमीत मला सर्व काही सोपे होते. जिथे इतर ऑफिसर गुन्हेगाराला शोधण्यासाठी धडपडत असत तिथे मला गुन्हेगाराची सर्व काही कुंडली आधीपासून ठाऊक असायची. भल्या भल्याना जिथे रक्त पाहून भोवळ येते तसले सीन्स मी खूप आधीच पहिले होते. बाकीच्या पोलिसा सारखा मी नाही, I have looked into the abyss" कैलासचा स्वर ऐकून स्वरा सुन्न झाली होती. कैलासाला तिने नेहमीच एक चांगला ऑफिसर म्हणून पहिले होते पण आज तिच्या पुढे वेगळाच पैलू पुढे येत होता.
"कैलास, तू जे काही सांगतोस ते मी वरिष्ठाना सांगितले तर तुला CBI मधून काढून टाकले जाईल." तिने म्हटले.
"May be, May be not. स्वरा गुन्ह्याच्या जगतांत मी एखाद्या भटक्या सन्यास्यां प्रमाणे फिरताना गुन्ह्याच्या त्या जगाने माझ्या आत्म्यांत सुद्धा डोकावून पहिले. गुन्हेगारीच्या जगांत तू खूप काही करू शकतेस पण त्याच वेळी काही गोष्टी फक्त सरकारी समर्थनाने केल्या जाऊ शकतात म्हणून मी CBI मध्ये आलो. माझे आई वडील आणि निरुपमा ह्यांचा मला शोध घ्यायचा होता."
"मग तू शोध घेतलास ? काय सापडले तुला ? " तिने विचारले.
कैलासने नकारार्थी मान हलवली.
"सरकारदरबारी माझ्या वडिलांची नोंद कुठेच नव्हती. RAW मध्ये नाही, IB मध्ये नाही, मिलिटरी मध्ये पण नाही. शिवाने पण एक महत्वाची माहिती दिली होती. माझ्या वडिलांनी सलीम नावाच्या एका आर्मी ऑफिसर सोबत काम केले होते. सलीम आणि जयशंकर कौल ह्यांनी तिबेटियन बॉर्डरवर काही तरी काम केले होते. मी खूप प्रयत्न करून सलीम ना शोधले. आर्मी फाईल्स मध्ये सलीम भारत-चीन सीमेवर अपघातांत मृत्युमुखी पडले असे लिहिले होते पण दिल्ली मधील खान मार्केट मध्ये एका व्यापाऱ्याने सलीमचा फोटो ओळखून मला त्याचा पत्ता दिला. सलीम कोलकाता मध्ये के श्रीमंत व्यापाऱ्याच्या सुरक्षेचं काम पाहत होता. त्याने नाव सुद्धा बदलले होते. सलीम आर्मी मध्ये जिओलॉजीस्ट होता. जयशंकर कौल आणि सलीम इंडो तिबेट सीमेवर दोन CIA एजन्ट च्या शोधांत फिरत होते. सलीम ला तो भाग ठाऊक असल्याने त्याला मिलिटरी इंटेलिजन्स ओफिसर कौल बरोबर पाठवले होते. दोघेजण आणि एक शेर्पा अशी मंडळी ३० दिवस हिमालयात भटकत होती. शेवटी एका गुंफेत त्यांना एक व्यक्ती सापडली. त्या दोन्ही व्यक्तींना कौल साहेबानी गोळी घालून मारले आणि शेर्पाला सुद्धा मारले. त्यांनी सलीम ना सुद्धा गोळी मारली असती पण सलीम ह्यांनी एका घळींत उडी घेतली. त्यांत ते जखमी झाले आणि त्यांचा एक डोळा निकामी झाला पण ते जीव वाचवून परत आले तेंव्हा आर्मीने एक खोटी स्टोरी करून त्यांना मृत गोष्टी केले होते. ते समोर आले असते तर त्यांना नक्कीच पुन्हा मारले गेले असते म्हणून त्यांनी अज्ञात वास पत्करला. इतक्या वर्षांत माझ्या वडिलांच्या सर्वांत जवळ मी पोचलो असेंन तर ह्याच दुव्याने. "
"पण सलीम नी एक महत्वाचा क्लू मला दिला. गुंफेत मारले गेलेल्या दोन्ही व्यक्तींच्या जवळ चामड्याची दोन बॅग्स होती. त्या बॅग्स वर एक विशेष लोगो होता. आश्चर्य म्हणजे गूगल च्या ह्या दुनियेत अत्यंत शोध घेऊन सुद्धा त्या लोगोची एकही कंपनी मला बराच काळ सापडली नाही पण एक दिवस मी हैदराबाद मधील जुन्या पुस्तकाच्या दुकानात गेलो असता मला एक वर्ल्ड वॉर २ वरील एक कॉफी टेबल पुस्तक दिसले सहज म्हणून चाळले असता त्यांत एक जर्मन वैमानिका कडे मला एक बॅग दिसले ज्यावर तोच लोगो होता. तो फोटो इंटरनेटवर कुठंही नव्हता. पण त्या वैमानिकाला मी शोधून काढले. लेफ्टनंट बी सोमर. द्वितीय महायुद्ध सुरु होण्याच्या आधी सोमर भारतात आले होते.त्यानंतर त्यांना कुणीही पहिले नाही. प्रत्यक्ष युद्धांत सुद्धा त्यांचा भाग नव्हता. जणू काही काळाने त्यांना भारतांत गायब केले असावे. "
"पण त्याच्या शोधांत एका आंतरराष्ट्रीय स्मग्लर शी माझी ओळख झाली. तो स्मग्लर महायुद्धातील सामानाचा लिलाव करत असे. हिमलरची डायरी पासून अशॊविझ मधील ज्यू लोकांच्या मृतदेह पासून सर्व काही त्याच्या कडे होते. त्याने मला सांगितले त्या बॅग चा संबंध हिटलरच्या अत्यंत गुप्त आणि खास टास्कफोर्सशी होता. त्याला माझ्या वडिलांचे नाव सुद्धा ठाऊक होते पण आणखीन काहीही माहिती त्याने दिली नाही. फक्त एक कॉन्टॅक्ट दिला. "
"तेंव्हापासून मी CBI जॉईन केले. मला जी माहिती पाहिजे ती इथे सहज पणे मिळते. म्हणून मी प्रमोशन्स नाकारली. माझे वडील देशद्रोही नव्हते, ते एक फार मोठ्या सत्याच्या मागावर होते. निरुपमा कुठे आहे हे सुद्धा त्याच्याशीच संबंधित आहे. पण हे माझे स्वतःचे युद्ध आहे त्यांत मी तुला विनाकारण ओढू शकत नाही. "
"पण तुला काश्मीर आठवते का ?” - स्वराने विचारले
"प्रत्येक क्षणी ! आमच्या घरापुढील ते चिनार वृक्ष, हवेतील तो गारवा आणि हवाहवासा वाटणारा तो दरवळ, घराच्या काहीच अंतरावर असणारे ते महाकालाचे मंदिर. तेथील शैव पुजारी. आणि तेथे एका झाडाला एक झोपाळा होता त्यावर झोके घेणारी निरुपमा. I remember it all, I relive it all again and again.”
कैलास उठला आणि स्वराने त्याच्यासाठी दार उघडले.
.