Android app on Google Play

 

प्रकरण दुसरे : काडतूस

 

मुंबई शहर. जगांतील सर्वांत प्रसिद्ध अश्या शहरांपैकी एक. प्रत्येक शहराची आपली अशी एक खालची दुनिया असते. काही लोक त्याला अंडरवर्ल्ड म्हणतात पण खरे तर अंडरवर्ल्ड वाले सुद्धा वरच्या दुनियेत वावरतात. त्यांचे फोटो पेपर मध्ये येतात. खरे तर प्रत्येक शहराचा एक नरक असतो जिथे वावरणारे लोक बहुदा वर दिसत नाहीत. फार कमी लोक त्या नरकात जाऊन पुन्हा वर येऊ शकतात, पण त्याची एक किंमत असते जी त्यांना मोजावी लागते. कैलाशला सुद्धा ती किंमत मोजावी लागत होती.

CBI कैलाससाठी नोकरी नव्हती त्याच्यासाठी तो एक मार्ग होता. कैलासाच्या मनात नक्की काय आहे हे फार कमी लोकांना ठाऊक होते. स्वरा पार्टनर म्हणून त्याच्या विश्वासाची असली तरी अजून त्याने तिला संपूर्ण सत्य सांगितले नव्हते. बाहेर धो धो पाऊस पडत होता आणि वायपर पूर्ण वेगाने चालू असून सुद्दा रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. कैलास भरधाव वेगाने चालला होता. पारसी कॉलनीच्या एक्सिट वर त्याने गाडी बाहेर काढली. मुंबई शहराचा हा एक पुरातन भाग. कोलाबा एरिया च्या सुंदर दिमाखदार वैभवांत हा भाग थोडा लपल्या प्रमाणे वाटत होता. त्याने गाडी एक या निळ्या रंगाच्या इमारतीपुढे थांबवली. इमारतीवर काहीही बोर्ड नव्हता. पण कैलासने ती इमारत शेकडो वेळा पहिली होती. कस्तुरीम्रुगाच्या म्हणे नाभीत कस्तुरी असते आणि त्याच्या वासाच्या शोधांत तो मृग इकडे तिकडे भटकतो. हि इमारत त्याच प्रमाणे होती. मुबई शहराच्या नकाशावर सुद्धा ह्या इमारतीचे नामोनिशाण नव्हते. जणू काही इतर सर्व शहराला हि इमारत दिसत सुद्धा नाही अश्या प्रमाणे ती उभी होती. भिंती दगडी असल्याने नक्की किती जुन्या असाव्या ह्याचा अंदाज नव्हता. कैलास गाडीतून उतरला. पाऊसाने तो भिजत होता पण त्याने फार मोठा कोट घातला असल्याने जून पाणी आंत शिरले नव्हते.

कैलासने त्या इमारतीच्या दाराजवळ जाऊन दार वाजवले. जुन्या पद्धतीचे लाकडी द्वार कैलासाच्या ओळखीचे होते. फार कमी लोक त्या दाराच्या दुसऱ्या बाजूला गेले होते. मोठ्या दाराला एक छोटी खिडकी होती. त्या खिडकीतून एक नेहमीच ओळखीचा चेहरा दिसला पण त्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. कैलासाला ह्यांत काही नवीन नव्हते. दार नंतर उघडले. कैलासने आंत येताच त्याचा कोट त्या जाड्या माणसाने घेतला. कैलासाचा सूट भिजला नव्हता. आतील खोलींत मंद प्रकाश होता. उजव्या बाजूला बार होते जिथे पांढऱ्या गणवेशातील नेहमीचा बारटेंडर ड्रिंक्स सर्व करत होता. बार वर अनेक मंडळी होती. लाल आणि काळ्या कॉकटेल ड्रेस मधील सुंदर युवती आणि त्यांच्या बरोबर असलेला काळ्या सूट मधील विविध आकाराचे आणि वयाचे पुरुष. त्या कपड्याशिवाय आंत कोणाला प्रवेशच नव्हता. उजव्या बाजूच्या दुसर्या कोपऱ्यांत कैलासने नजर फिरवली. दोन मोठ्या टेबल्स च्या बाजूला काही पुरुष मंडळी बाजून गप्पा करत होती त्यांच्या हातांत सिगारेट्स होत्या आणि टेबलवर विस्की.

कैलास सरळ बार जवळ गेला. त्याची नजर तिला शोधत होती पण ती अजून अली नव्हती. कैलासने बारटेंडरच्या नजरेला नजर भिडवली आणि त्याने अदबीने आणून कैलासाचे नेहमीचे ड्रिंक दिले. त्याच्या बरोबरच त्याने कैलासाच्या हातांत एक चावी ठेवली रूम नंबर ११२. काहीच्या भुवया उंचावल्या. ड्रिंक संपवून कैलास उठला आणि बारच्या बाजूने चालत आंत गेला. अनेकदा तो ह्या वाटेने गेला होता पण प्रत्येक वेळा त्या मार्गाची हुरहूर वेगळीच होती. एक अगम्य शक्ती आपला पाठलाग करत आहे असेच त्याला वाटायचे. बारच्या बाजूचा लांब कॉरीडॉर सरळ पुढे जात होता, तो जिथे संपतो तिथून डाव्या बाजूला एक लाकडी जिना होता. जिन्यावर जुना १०० वॉट्स चा बल्ब जळत होता. जिन्यावर पाय ठेवला कि तो जुन्या भुतांच्या चित्रपटात येतो तास कर्रर्रर्र आवाज यायचा. जिन्याचा डाव्या बाजूला भिंत होती आणि त्या भिंतीवर अनेक नानाविविध छाया चित्रे होती. जुन्या काळाची. कुणी तरी महाराजा सारखा माणूस रोल्सरॉयस वर बसून, एक गोरी स्त्री गाऊन मध्ये, दोन सैनिक सिगारेट ओढताना इत्यादी. कैलासने ह्याच्या आधी अनेकदा ती छायाचित्रे पहिली होती. मनात त्याच्या मागच्या कथा काय असतील असा सुद्धा विचार केला होता. तो जिना वर चढू लागला तसा त्याला तो बोर्ड दिसला. "शालिमार" एका वेगळ्याच फॉन्ट मध्ये इंग्रजीत लिहिलेला तो लाकडी बोर्ड जिन्याच्या वरच्या भागात भितींवर खिळ्यांनी ठोकला होता. बोर्ड कित्येक दशके जुना असावा असे त्याच्या उडालेल्या रंगावरून वाटत होते. ह्याच बोर्डवरून ह्या जगेचिये नाव शालिमार पडले होते. जिना संपतो तिथे पहिल्या मजल्यावर एक प्रशस्त हॉल होता. एका बाजूला डेस्कवर एक रिसेप्शनिस्ट मुलगी शांतपणे बसून होती. कैलासाला तिने पहिले सुद्धा नाही तर दुस्र्या टोकाला नटराजाची भव्य मूर्ती.

कैलासने हे सर्व दृश्य अनेकदा पहिले होते. पण तो जिना चढणे प्रत्येक वेळी त्याच्यासाठी एक वेगळा अनुभव होता. तो लाकडी फ्लोर वरून चालत रूम ११२ कडे गेला. कैलास तरुण होता तेंव्हा इतर लोकांप्रमाणेच आदर्शवादी होता. त्याचा मोठा भाऊ पोलीस मध्ये होता. ९२ च्या दंगल संपली तेंव्हा तो आणि त्याचा भाऊ शहरांत पोलिसांच्या जीप मधून फिरत होते. एका भागांत आले तेंव्हा तिकडे मृत देहांचा खच पडला होता. कुठली तरी झोपडपट्टी असावी. काही लोक जखमी असून विव्हळत होते. महिलांच्या अंगावरचे कपडे ओरबाडून काढले गेलं होते. कोण मेला होता नि कोण जिवंत होते हे सांगणे मुश्किल होते. एक १०-१२ वर्षांचा पोर एका जावा जवळ मृत मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचे मित्र हसत होते. पोलीस पाहून ते पळून गेले. कैलासाचे डोळे मिटले. त्याला ते दृश्य पाहवत नव्हते. पण त्याच्या भावाने त्याला त्या सर्वांच्या मधोमध उभे केले. "कैलास, डोळे वळवू नकोस. पहा. तू जो पर्यंत हे सर्व काही पाहत नाहीस तो पर्यंत तुझे मन ह्या गोष्टी सत्य म्हणून मानणार नाहीत. जे काही इथे तुला दिसत आहे ते सत्य आहे हे मानून तू जेंव्हा पाहशील तेंव्हा तुझ्या मनातील भय दूर होईल. हा पोलिसांचा गणवेश जो मी घातला आहे ना, तो सरकारी नोकरी म्हणून नाही तर एक सतीचे वाण म्हणून घेतलाय. जो पर्यंत पूर्णतः निडर आणि निर्भय होऊन तुझे डोळे जे जग पाहू शकत नाहीत तो पर्यंत तू हा गणवेश सुद्धा घालू शकणार नाहीस".

रूम ११२ कडे चालताना त्याला ते शब्द आठवत होते. किती सत्य होते ते. कैलासाच्या भावाला जग जसे आहे तसे दिसत होते. जगातील चांगल्या वाईट गोष्टी तितक्याच सत्य आहेत आणि निसर्गाला त्यांत काहीही भेदभाव वाटत नाही हे सुद्धा त्याला अनुभवाने पटले होते. शालिमारचे दार त्यांनाच उघडते ज्यांना हे मर्म समजले आहे. आदर्शवादी लोकां साठी शालिमार हि जागा नाही. नरकात जाऊन वर येणाऱ्या माणसांचा स्वभावच वेगळा असतो. रम ११२ चे दार उघडताना हे सत्य कैलासाच्या मनात एखाद्या दैत्या प्रमाणे विक्राळ स्वरूप घेऊन उभे होते. त्या दिवशी त्या दंगलीत कैलासने डोळे उघडून नरसंहार आणि पाशवी अत्याचार पहिले होते. ती गल्ली सोडून तो जेंव्हा घरी गेला आणि त्या घटने नंतर वर्षे उलटली तरी सुद्धा आपला एक तुकडा त्या गल्लीत आणि त्या काळांत अजून सुद्धा तसाच थिजून आहे असे त्याला वारंवार वाटत आले होते.

रूम ११२ मध्ये कैलास आला आणि त्याने दिवा लावला. शालिमार मधील कुठलाच दिवा तळपत नसतो त्याचा फक्त मंद उजेडाचा पडतो. रूमच्या मधोमध पलंग होता आणि दुसऱ्या बाजूला बाथरूम. एक टेबल आणि पलंगापुढे टीव्ही. पलंगावर नेहमी प्रमाणे एक युवती पडली होती. मागच्या माणसाने जशी ठेवली होती कदाचित तशीच वस्त्र विरहित आणि ग्लानीत. कैलास आंत आलाय ह्याची जाणीव तिने फक्त आपले पाय थोडे अलग करून दिले. कैलासाच्या मनात वासना नव्हतीच. आज तो आपल्या कामासाठी आला होता. पण तरीसुद्धा तो पलंगावर जाऊन पडला. त्या युवतीने आधी कैलासाची वाट पहिली पण कैलास काहीही हालचाल करत नाही हे पाहून तीच त्याच्या जवळ आली. कैलास थकला होता आणि ती इतक्या ग्लानीत होती कि तिला त्याच्या शर्टची बटणे काढायला सुद्धा जमत नव्हते. किती वेळ गेला कैलासाला आठवत नव्हते पण शेवटी तिच्या पायामध्ये तो होता आणि प्रत्येक हिसक्याबरोबर तिच्या तोंडाचे भाव बदलत होते. काही समजण्याच्या आधीच कैलासने वेग वाढवला. आणि तो संपून पुन्हा तो पलंगावर पडला. आता तो खरोखरच थकला होता. त्याला झोप कधी लागली समजलेच नाही.

त्याचे डोळे उघडले तेंव्ह्या पलंगाच्या बाजूच्या एक स्त्री बसली होती. तो हडबडून उठला. त्याच्या अंगावर कपडे नव्हतेच आणि बाजूची युवती तशीच पडली होती. "सावकाश.. काहीही घाई नाही ... " लाल गाऊन मधील त्या स्त्रीने सिगारेट शिलगावत कैलासाला इशारा केला. कैलास थोडा ओशाळुनच उठून बसला. त्याने खाली पडलेला आपला कोट उचलला आणि त्याच्या आतील खिशांतून एक पॉलिथिनची पिशवी काढली. "CBI Evidence" असे त्याच्यावर लाल अक्षरांत ठळक लिहिले होते. त्याने ती पिशवी त्या युवतीच्या हातांत दिली. तिच्या नखांवर गडद निळ्या रंगाचे नेलपॉलिश होते. त्या पिशवीत एक बुलेटची केसिंग होती. केस नंबर ३४५५. महाराष्ट्रांतील प्रसिद्ध विचारवंत आणि पत्रकार गणेश घाटपांडे ह्यांना भर चौकांत गोळी घालून अज्ञात हल्लेखोरांनी मारले होते. देशभर ह्याची प्रचंड खळबळ माजली होती. विरोधकांनी हा सरकारचा डाव आहे असे म्हटले होते तर सरकारला स्वतःला ह्याची काही माहिती नव्हती. कैलासाच्या सुत्रा प्रमाणे हल्ल्याचे धनी कोण हे खरोखरचे प्रश्नचिन्ह होते.

त्या स्त्रीने ती बॅग आपल्या पर्स मध्ये जपून ठेवली. "थँक यु" तिने कैलास कडे स्मित करत म्हटले आणि आपली सिगारेट बाजूच्या ash ट्रे मध्ये फेकली. "हे माझ्यासाठी खरोखरच मुश्किल काम होते" त्याने तिला म्हटले. "होय पण त्याचा मोबदलाही तितकाच चांगला आहे. त्याशिवाय जी दुसरी केसिंग त्या जागी तू ठेवली आहेस त्याच्या मुळे कुणालाही शंका येणार नाही." तिने म्हटले आणि पर्स मधून एक लिफाफा काढला. तो लिफाफा तिने कैलासाच्या हातांत ठेवला आणि ती उठून बाहेर गेली.

 मुंबईत गुन्ह्याची नगरी आहे पण ती नगरी सुद्धा शालिमार ला टरकून असते कारण शालिमार म्हणजे साक्षांत नरक आहे. तिचे येण्याची किंमत सर्वांचं मोजावी लागते. कैलासाला सुद्धा ती मजपावी लागली होती. आज त्याने देशांतील सर्वांत महत्वाच्या केस मधील पुरावे नष्ट केले होते. खरेतर घाटपांडेच्या हत्येचे धागेदोरे शालिमार पर्यंत आहे हे कळले तेंव्हाच हि केस काही सॉल्व होणारी नाही हे त्याने ताडले होते. कैलासने केसिंग बदलेल आणखीन कुणी तरी इतर पुरावे बदलणार होता. शालिमारचे वैशिष्ट्य तेच. सर्वांच्या नजरेपुढे राहून अदृश्य राहणारी ती इमारत होती. पण त्याच प्रमाणे शालिमार जिथे इन्व्हॉल्व्हड आहे ती केस जगासाठी सुटणार होती. पोलीस कोणाला तरी पकडणार होते, खटला चालणार होता आणि साज सुद्धा होणार होती. पण सत्य , ते मात्र नेहमीसाठी शालिमार मध्ये गडप होणार होते.

पण तो लिफाफा कैलास साठी महत्वाचा होता. त्यांत असलेली माहिती फक्त शालिमारच त्याला पुरवू शकत होती. कैलासने कपडे घातले आणि काळजीपूर्वक लिफाफा आतील खिशांत टाकला. तो बाहेर पडला तेंव्हा साकाचे ४ वाजत होते. पाऊस थमबाला होता पण ओल्या मातीचा तो दर्प मात्र हवेंत होता. गाडी सुरु करतांना त्याला आठवले. ओल्या मातीच्या त्या वासाला "पेट्रिचोर" असे म्हणतात. त्याला मोठ्या भावाने शिकवले होते.

कैलासने गांधी मार्दव सोडली आणि आरशांतून शालिमारची इमारत सुद्धा दिसेनासी झाली.

क्रमशः