Android app on Google Play

 

ज्यू व ख्रिस्ती मूर्तीविज्ञान

 

ख्रिस्ती प्रतिमाविद्येला दीर्घ व गतिमान परंपरा आहे. ख्रिस्ताच्या पारंपारिक प्रतिरूपणाबरोबरच ख्रिस्ती चर्चच्या उदयकाळापासून प्रचलित असलेल्या दृश्य प्रतीकांचाही तीत अंतर्भाव होतो. ही प्रतीके काही अंशी अज्ञ जनांस बोध घडविण्याच्या उद्देशाने तर काही अंशी धार्मिक सत्यांच्या अथवा संकल्पनांच्या प्रकटीकरणार्थ अवतरतात. आद्यकालीन भूमिगत थडग्यांतील भित्तिचित्रणात प्रतिमाविद्येचा उगम आढळतो. नौकेतील नोआ, सिंहाच्या गुहेतील डॅनियल, आगीच्या भट्टीतील तीन बालके अशा दृश्यांच्या मालिका त्यात आढळतात. ह्या दृश्यांच्या दरम्यान प्रार्थनेच्या आविर्भावातील उभ्या मूर्तींची (ओरंटीज) योजना केलेली आढळते.


रोमन साम्राज्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यानंतर पूर्वोक्त परंपरा काही अंशी अवशिष्ट राहिली, तथापि लवकरच मूर्तीविरोधी व मूर्तीभंजनात्मक वादही नव्याने निर्माण झाले. मोझेसच्या धर्माज्ञेनुसार ज्यू धर्मात मूर्ती खोदण्यास प्रतिबंध होता. चर्चच्या उदयकाळातही ख्रिस्ताच्या प्रत्यक्ष प्रतिमाचित्रणाऐवजी प्रतीके वापरण्यात आली. उदा.,क्रॉस. ते कॉन्स्टंटिनच्या काळापासून सार्वत्रिक वापरात होते. प्रारंभीच्या काळात ख्रिस्ताला क्रूसावर चढवल्याचे दृश्य प्रत्यक्षात न दाखविताक्रॉसच्या पायाशी पडलेले कोकरू हे प्रतीक उपयोजून ते सूचित केले जाई.

 कबूतर, मासा व गलबताचा नांगर ही पवित्र प्रतीकेही सुरुवातीच्या ख्रिस्ती कलेत दिसून येतात. प्रत्यक्ष मूर्तिचित्रण त्याज्य मानण्याची प्रवृत्ती पुढेही दिर्घकाळ टिकून राहिली. तथापि नायसीयाच्या दुसऱ्या धर्मसभेत इ. स. ७८७ मध्ये धार्मिक उद्‌बोधनाच्या उद्दिष्टातून प्रतिमानिर्मितीकरण्यासमान्यता देण्यात आली आणि तीत रोमन चर्चने लक्षणीय भर घातली. तथापि आठव्या-नवव्या शतकांतील मूर्तिभंजनात्मक प्रवृत्तीचा परिणाम पौर्वात्य वा बायझंटिन ख्रिस्ती कलेवर मात्र काहीसा जाणवतो.

बायझंटिन कलेमध्ये प्रतिमाचित्रण त्याज्य मानलेगेले नाही, तरी निर्मितीच्या निश्चित सूत्रांनी ते नियंत्रित मात्र झाले. त्यातून बायझंटिन कलेत प्रतिमाविद्येची सूक्ष्म व तपशीलवार अशी नियमप्रणाली प्रस्थापित झाल्याचेही दिसून येते. विविध विषय कसे आविष्कृत करावेत, यासंबंधी तपशीलवार सूचना देणाऱ्या पुस्तिका निर्माण झाल्या. त्यांपैकी माउंट अ‍ॅथोसही पुस्तिका प्रख्यात आहे. मूर्तिची ठेवण, हावभाव आदींसंबंधी निश्चित नियम, वास्तववादी प्रत्ययटाळण्यावरभर व चित्रणातील सहेतुक सपाटपणा हे या प्रतिमानिर्मितीचे प्रमुख गुणधर्म. यातूनच ग्रीक व रशियन रंगीत आयकॉन नामक चित्रांच्या निर्मितीसचालना मिळाली.

बायझंटिन व रोमनेस्कप्रतिमाविद्यांमध्ये इव्हॅंजेलिस्ट संतांच्या प्रतीकांचेहीचित्रण आढळते.सेंट मॅथ्यूचे देवदूत, सेंट लूकचे बैल, सेंट योहानचे गरुड व सेंट मार्कचे सिंह अशी प्रतीके होत. ख्राइस्ट इन ग्लोरीहा रोमनेस्क प्रतिमाविद्येचा सर्वसामान्य विषय. चर्चवास्तूंच्या दर्शनी भागांवर, इव्हॅंजेलिस्टसंतांच्या प्रतीकांच्यामध्यभागी तो सामान्यपणे रंगविलेला असे.

गॉथिक कालीन प्रतिमाविद्येमध्ये विषयांच्या नाविन्याबरोबरच मानवी आस्थाविषयांच्या चित्रणावर नव्याने भर देण्यात आला. उदा., मॅडोना व बालक या दृश्यात केवळ धार्मिक उपासनेला विषय म्हणून बालकाचे चित्रण करण्यापेक्षा, बालकाला स्तनपान देणाऱ्या मॅडोनाच्या वात्सल्यभावावर अधिक भर दिलागेल्याचे दिसून येते. प्येता’ म्हणजे कुमारी मातेने मृत ख्रिस्ताला मांडीवर घेतले आहे. हा नव्याने विशेषेकरून आढळणारा विषय. व्हर्जिनम्हणजे  कुमारी माता या विषयालाही जास्त जास्त प्राधान्य येत गेले.

मध्ययुगीन प्रतिमाविद्येचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे बायबलच्या जुन्यानव्याकरारांचा साधलेला समन्वय. त्याचे प्रत्यंतर आर्म्ये येथील कॅथीड्रलच्या दर्शनी भागावरील शिल्पांकनातही मिळते. त्यातमध्यभागी ख्रिस्ताची प्रख्यात मूर्ती –Le Beau Dieu - असून, तिच्या दुतर्फा अपॉसल्स व प्रॉफेट यांच्या प्रतिमा आहेत. ख्रिस्ती धार्मिक कलेची व्याप्ती जसजशी वाढत गेली, तसतसे प्रतिमाविद्येचे अभ्यासक्षेत्रही विस्तारत गेलेहे दिसून आले. त्याचा परमोत्कर्ष प्रबोधनकाळात पाहावयास मिळतो.

यथादर्शनाच्या तत्त्वामुळे व अवकाश संयोजनामुळे प्रबोधनकालीन प्रतिमाविद्येला नवनवी परिमाणे लाभत गेली. चित्रातील मानवीआकृत्यांचे परस्परसंबंध व त्यांची वास्तुशिल्पीय पार्श्वभूमीयांच्या चित्रणास नव्या निसर्गवादी दृष्टिकोनाची जोड लाभली. तसेच मुख्य धार्मिक विषयाच्या चित्रणास पूरक म्हणून वा पार्श्वभूमीदाखल दैनंदिन जीवनातील दृश्येही चितारली जाऊ लागली. लौकिक विषयांची अभिव्यक्ती हीही प्रतिमाविद्येच्या अभ्यासाची एक शाखा स्थूल अर्थाने मानली जाते.