Android app on Google Play

 

पारशी व इस्लामी मूर्तीविज्ञान

 

पारशी, इस्लामी, ज्यू, ख्रिस्ती यांसारख्या धर्मांनी प्राचीन देवदेवतांच्या अनेकत्वाला, मूर्तीपूजेला व तद्जन्य प्रतिमानिर्मीतीला विरोध केला. पारश्यांच्या अहुर मज्द या देवाचे चित्रण सपक्ष सूर्यबिंब दर्शवून केले जाई.


धार्मिक कलेमध्ये सजीव व्यक्तिमात्राचे चित्रण निषिद्ध ठरवण्याबाबत इस्लाम धर्म हा अधिक कर्मठ होता. धार्मिक क्षेत्रात त्यांच्या कलाभिव्यक्तीस अवसर मिळाला तो मुख्यत्वेकरून मशिदीच्या वास्तुनिर्मितीमध्ये. भौमितिक अलंकरण व कुराणाचे सुशोभन यांतही त्यांची कला सामावली आहे. चंद्रकोर हे इस्लामी धर्मातील एक महत्त्वाचे प्रतीक होय.