Android app on Google Play

 

ईजिप्शियन मूर्तीविज्ञान

 


ईजिप्शियन देवता स्थानिक व वैश्विक अशा दुहेरी माहात्म्याने युक्त असत. त्यांचे प्रकटीकरण उत्थित शिल्पे, मूर्तिशिल्पे व चित्रकला या माध्यमांतून अर्धमानवी व अर्धपाशवी रूपांत झाल्याचे दिसून येते. मानवी शरीरे व प्राण्यांची शिरे असलेल्या ह्या प्राण्यांचा उगम कुलचिन्हदर्शक प्राण्यांमध्ये टोटेम अ‍ॅनिमल्स असावा. उदा., प्ताह हा सृष्टीचा निर्माता बैलाच्या रूपात; तर हथोर ही आदिमाता गाईचे शिर काढून दर्शवित. बहिरी ससाण्याचे शिर असलेला रा (रे) हा सूर्यदेव फेअरो राजाशी एकरूप मानला जाई व कित्येकदा पंखहीन स्फिंक्सच्या रुपातही दर्शविला जाई. ईजिप्शियनांची मरणोत्तर जीवनावर श्रद्धा असल्यामुळे ह्या जीवनाची निर्दशक अशी चित्रे व मूर्तिशिल्पे थडग्यांमधून आढळतात.