विठ्ठल आवडी प्रेमभावो
विठ्ठल आवडी प्रेमभावो ।
विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥
तुटला हा संदेहो ।
भवमूळव्याधीचा ॥२॥
ह्मणा नरहरी उच्चार ।
कृष्ण हरी श्रीधर ।
हेंचि नाम आह्मां सार ।
संसार तरावया ॥३॥
नेघों नामाविण कांहीं ।
विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा ह्मणे तरलों पाहीं ।
विठ्ठल विठ्ठल ह्मणतांचि ॥४॥
विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥
तुटला हा संदेहो ।
भवमूळव्याधीचा ॥२॥
ह्मणा नरहरी उच्चार ।
कृष्ण हरी श्रीधर ।
हेंचि नाम आह्मां सार ।
संसार तरावया ॥३॥
नेघों नामाविण कांहीं ।
विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा ह्मणे तरलों पाहीं ।
विठ्ठल विठ्ठल ह्मणतांचि ॥४॥