काय सांगों देवा ज्ञानोबाची
काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती ।
वेद म्हैशामुखीं बोलविलें ॥१॥
कोठवरी वानूं याची स्वरूपस्थिती ।
चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥
अविद्या मायेचा लागों नेदी वारा ।
ऐसें जगदोद्धारें बोलविलें ॥३॥
नामा ह्मणे यांनीं तारिले पतित ।
भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥
वेद म्हैशामुखीं बोलविलें ॥१॥
कोठवरी वानूं याची स्वरूपस्थिती ।
चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥
अविद्या मायेचा लागों नेदी वारा ।
ऐसें जगदोद्धारें बोलविलें ॥३॥
नामा ह्मणे यांनीं तारिले पतित ।
भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥