पंढरीचा राजा उभा
पंढरीचा राजा उभा भक्तकाजा ।
उभारूनि भुजा वाट पाहे ॥१॥
घ्यारे नाम सुखें प्रेमें अलौकिक ।
साधनें आणिक करुं नका ॥२॥
मनाचेनि मनें ह्रदयीं मज धरा ।
वाचेनें उच्चारा नाम माझें ॥३॥
बोलोनियां ऐसे उभा भीमातीरीं ।
नामा निरंतरीं चरणापाशीं ॥४॥
उभारूनि भुजा वाट पाहे ॥१॥
घ्यारे नाम सुखें प्रेमें अलौकिक ।
साधनें आणिक करुं नका ॥२॥
मनाचेनि मनें ह्रदयीं मज धरा ।
वाचेनें उच्चारा नाम माझें ॥३॥
बोलोनियां ऐसे उभा भीमातीरीं ।
नामा निरंतरीं चरणापाशीं ॥४॥