Get it on Google Play
Download on the App Store

माझा भाव तुझे चरणीं

माझा भाव तुझे चरणीं ।
तुझें रूप माझे नयनीं ॥१॥

सापडलों एकामेकां ।
जन्मोजन्मीं नोहे सुटका ॥२॥

त्वां मोडिली माझी माया ।
मी तो जडलों तुझिया पायां ॥३॥

त्वां मज मोकलिले विदेही ।
मी तुज घातले हृदयीं ॥४॥

नामा ह्मणे गा सुजाणा ।
सांग कोणे ठकविलें कोणा ? ॥५॥

संत नामदेव

स्तोत्रे
Chapters
अच्युता अनंता श्रीधरा अमृताहूनि गोड नाम आधीं रचिली पंढरी काय माझा आतां काय सांगों देवा ज्ञानोबाची काळ देहासी आला खाऊं कुत्‍ना थमाल ले थमाल चक्रवाक पक्षी वियोगें डोलत डोलत टमकत तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव ह्मणे नाम्या पाहें देह जावो अथवा राहो देहुडा चरण वाजवितो नाम तेंचि रूप नामाचा गजर गर्जे परब्रह्म निष्काम तो हा पक्षिणी प्रभातीं चारियासी पंढरीचा राजा उभा पंढरीचा वास चंद्रभागे पंढरीची वारी जयाचिये पंढरीचे जन अवघें पंढरीनिवासा सख्या प्रेमपिसें भरलें अंगीं बोलूं ऐसे बोले माझा भाव तुझे चरणीं माझे मनोरथ पूर्ण रात्र काळी घागर काळी रूपें श्यामसुंदर निलोत्पल विठ्ठल आवडी प्रेमभावो वैष्णवां घरीं सर्वकाळ सुखाचें हें सुख श्रीहरि सोयरा सुखाचा विसांवा