बोलूं ऐसे बोले
बोलूं ऐसे बोले । जेणें बोलें विठ्ठल डोले ॥१॥
प्रेम सर्वांगाचे ठायीं । वाचें विठ्ठल रखुमाई ॥२॥
नाचूं कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावूं जगीं ॥३॥
परेहुनि परतें घर । तेथें राहूं निरंतर ॥४॥
सर्वसत्ता आली हातां । नामयाचा खेचर दाता ॥५॥