हेल्दी फूड चे दुष्परिणाम
या ओट्स, ऑलिव्ह तेल, ब्रेकफास्ट
सीरियल्स, किवी, ब्रोकोली वगरे पदार्थाबाबत असे काही चित्र उभे केले जाते, की यांचे सेवन केले
की हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, स्थूलत्व आदी भारतीयांना ग्रासणाऱ्या जीवनशैलीजन्य आजारांवर सहज
मात करता येईल. परंतु ही चक्क फसवणूक आहे. कारण या सगळ्या प्रकारात जीवनशैलीजन्य
आजारांची जी खरी कारणे आहेत, त्यांकडे साफ दुर्लक्ष झालेले दिसते. साखर, मदा, रिफाइण्ड धान्ये, मीठ, जंक फूड, तळलेला आहार यांचे
नित्य सेवन, आहारसेवनाचे दोष,
व्यस्त, स्पर्धात्मक, तरीही बठी जीवनशैली, परिश्रमांचा, व्यायामाचा, घामाचा अभाव, पोटावरची चरबी, स्थूल शरीर, मानसिक ताण आदी मूळ
कारणांचा विचार न करता केलेले अन्य प्रयत्न निर्थक आहेत. मूळ कारणांकडे
दुर्लक्ष करून केवळ हे अन्नपदार्थ खाऊन तुम्ही आजारांचा प्रतिबंध करू पाहत
असाल तर तो प्रयत्न फोल ठरेल यात शंकाच नाही.
ऑलिव्ह, ओट्स, ब्रोकोली, किवी, सफरचंद वगरे
कोणतेही परकीय फळ वा भाजीची बी आपल्या भूमीमध्ये निसर्गत: उगवत नाही. इथेच खरे तर
ते पदार्थ आपल्यासाठी बनलेले नाहीत याचा संदेश निसर्गाने दिलेला आहे. प्रत्येक
व्यक्तीची प्रकृती, अग्नी, बल, वय, कामाचे स्वरूप या सर्वाचा विचार करून आपल्याला सात्म्य होईल ते
अन्न सेवन करावे. तेसुद्धा ऋतू-काळ-प्रदेश यांना अनुसरून- असे आयुर्वेदात म्हटले
आहे. परंतु परकीय पदार्थाचे सेवन करताना या मूलभूत आरोग्यनियमांना पूर्णपणे
धाब्यावर बसवले जाते.