ब्रोकोलीमधून काय मिळते?
ब्रोकोलीमधून आपल्या आरोग्याला उपकारक
असे काय मिळते- जे आपल्या भाज्यांमधून मिळत नाही? कोिथबीर (४८०० मायक्रो ग्रॅम), अळूपान (५९२०
मायक्रो ग्रॅम) आणि माठ (८३४० मायक्रो ग्रॅम) यांच्याहून पावपटीपेक्षाही कमी (६२३
मायक्रो ग्रॅम) बीटा-कॅरोटिन ब्रोकोलीमधून मिळते. रक्तनिर्मितीमध्ये आवश्यक फॉलिक
अॅसिड ब्रोकोलीपेक्षा (६३ मायक्रो ग्रॅम) कितीतरी अधिक पालक, माठ व टाकळ्यामधून
मिळते. विविध जीवनसत्त्वे आणि लोह,
जस्त आदी खनिजे, प्रथिने आदी सर्वच
पोषक घटक पुरविण्यात ब्रोकोली भारतीय भाज्यांपेक्षा बरीच कमजोर आहे. मग लोक का
खरेदी करतात ब्रोकोली? ५६ हून अधिक प्रकारच्या पालेभाज्या आणि ४४ हून अधिक प्रकारच्या
फूल-फळभाज्या ज्या भारतात पिकतात,
तिथल्या लोकांनी परकीय भूमीत उगवणारी, खुडल्यानंतर
बर्फात साठवलेली आणि कोणतेही विशेष पोषणमूल्य न देणारी ब्रोकोलीसारखी भाजी
का खावी?