ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश रियासतीत
ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश रियासतीत, भाल्यांची हिंदुस्थानी परंपरा चालू होती; परंतु पायदळ भाले वापरीत नसे. घोडदळात भालाईत रिसालेच भाला, तलवार व पिस्तुल वापरीत. घोडदळातीस पहिल्या पंक्तीतील सर्व घोडेस्वार भालाईत असत. भालाईत घोडेस्वारांचा मोठा दरारा असे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भाल्याची पाती चौधारी असत. भाल्याचे दंड हिंदुस्थानी शाही किंवा टोंकीन (इंडोयाचना) बांबूचे अथवा पोलादी नळीचे असत. भालाईत डोळ्याला पटका बांधीत व अंगात अत्खलक घालून त्यावर कमरबंद बांधीत विसाव्या शतकारंभी घोडेस्वारांच्या भाला व तलवारी काढून त्यांना बंदूका देण्यास काही वरिष्ठ सेनापतींचा विरोध होता. डिसेंबर १९२७ मध्ये भारतीय घोडदळातील भाले काढून घेण्यात आले.