भाल्याचे मुख्य तीन भाग
मुख (हलमुख) किंवा डोके (फाळ), दंड , पार्श्व किंवा पादत्राण असे भाल्याचे मुख्य तीन भाग असतात.
मुखाच्या अग्राने खुपसता येते. दंडाच्या एका टोकांवर मुख व विरूद्ध टोकांवर पादत्राण बसवितात. मुख ते पार्श्व धरून भाल्याची जास्तीत जास्त लांबी ७ मी. आढळते. डोक्याची लांबी ७५ सेंमी. पर्यंत असते. भाल्याचा फाळ दगडाचा, हाडाचा किंवा धातूचा असतो.
दंड गोल असून लोखंडाचा किंवा बाबूंचा असतो.
पादत्राण लोखंडी असते भाल्याच्या पादत्राणाचे टोक जमिनीत खुपसून व भाला उभा किंवा तिरपा धरून भाला तटबंदी उभी करण्यात मराठा राऊत पटाईत होते