Get it on Google Play
Download on the App Store

प्राचीन काळापासून

प्राचीन वैदिक वाङ्मयात व राजनीतीपर ग्रंथांत भाल्याच्या संदर्भात कुत, तोमर, शूल, शल्य, प्रास, भल्ल, मुक्तत, शक्ती, शक्र व त्रिशूळ इ. अनेक नावे आढळतात.

कौटिलीय अर्थशास्त्रात वरील नावांबरोबर हाटक, वराहकर्ण,  कणय, कर्पण व त्रासिक अशी नावे आढळतात. ही वेगवेगळी नावे भाल्याच्या मुखाच्या शिल्पावरून व वापरण्याच्या पद्धतीवरून पडली असावीत. उदा., भल्ल हा हातात धरण्याचा; शल्य, प्रास व त्रासिक हे फेकण्यासाठी आणि त्रिशूळ व शक्ती हे बहुकामीखुपसण्यासाठी तसेच घोडेस्वाराला खाली ओढण्यासाठी भाले होत.

 ज्या शस्त्राच्या मूळ शिल्पात कालपरत्वे मुळीच बदल झालानाही, असे भाला हे एकमेव शस्त्र आहे. प्राचीन काळी झाडाची सरळ फांदी तोडून, तिचे एक टोक अणुकुचिदार करून व ते अग्नीत घालून टणक करीत. पुढे भाल्याच्या फाळात व दंडात फरक होत गेले.