भाला
भाला हे भूसेनेतील
पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे.याला दंडशस्त्र असेही म्हणतात. भल्ल
(भाल्याचे पाते) या
संस्कृत शब्दापासून भाला शब्द रूढ झाला.
भाल्याच्या फाळाने शत्रूला भोसकून जायबंदी करता येते.
भाल्याने झालेली जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही. बाण हे भाल्याचे छोटे स्वरूप होय. हलके व आखूड भाले शत्रूवर फेकता येतात. द्वंद्वयुद्धात अंगाशी न भिडता
भाल्याचा
उपयोग केला जाई.