सिंधू संस्कृतीत
सिंधू संस्कृतिकालीन भाल्यांचे फाळ तांब्याचे असून ते सरळ धारेचे किंवा काटेरी असत. वैदिक काळात भाल्यांना फारसे महत्त्व नव्हते. मरूतांकडे प्रास वगैरे प्रकारचे भाले असत. रामायणकालात प्रास म्हणजे फेकण्याचा भाला वापरात होता. महाभारतातील उल्लेखावरून कंबोज, गांधार येथील घोडेस्वार भालाईत होते.