Get it on Google Play
Download on the App Store

कृष्ण

http://bharatdiscovery.org/bharatkosh/w/images/thumb/3/3f/Gita-Krishna-1.jpg/300px-Gita-Krishna-1.jpg

भगवान श्रीकृष्ण सोळा कलांमध्ये प्रवीण होता. तो जितका मायावी होता तितकाच मानवी होता. त्याचे रहस्यमय व्यक्तिमत्व तर मोठमोठे तपस्वी आणि योगी देखील ओळखू शकले नाहीत. एकीकडे तो आपला दरिद्री मित्र सुदामाचे चरण धुतो तर दुसरीकडे आपल्या आत्याचा मुलगा शिशुपाल याचा वध करतो. त्याच्या रहस्यमय व्यक्तिमत्वाचे सर्वांत मोठे उदाहरण हे आहे की अर्जुनाने सूर्यास्ताच्या पूर्वी जयद्रथाचा वध करण्याची शपथ घेतली होती आणि म्हटले होते की जर आज मी सूर्यास्ताच्या पूर्वी जयद्रथाला मारू शकलो नाही तर अग्निचितेवर झोपेन. कृष्णाने अर्जुनाला या गोष्टीसाठी प्रोत्साहन देखील दिले होते कारण त्याला महित होते की आज सूर्यग्रहण आहे आणि सूर्य काही वेळासाठी दिसणार नाहीये. झाले हेच की अर्जुनाने चिता तयार केली तेव्हा ते पाहण्यासाठी जयद्रथ देखील आला आणि त्याच वेळी सूर्य पुन्हा दिसू लागला. कृष्णाच्या इशाऱ्यावर अर्जुनाने क्षणभरात जयद्रथाचा शिरच्छेद केला.

या धरतीवर त्याच्यापेक्षा कोणीही ईश्वरतुल्य नाहीये, म्हणून त्याला पूर्ण अवतार म्हटले गेले आहे. कृष्णच गुरु आणि सखा आहे. कृष्णच भगवंत आहे. कृष्ण आहे राजनीती, धर्म, दर्शन आणि योगाचे पूर्ण वक्तव्य. कृष्णाला जाणणे आणि त्याची भक्ती करणे हिंदुत्वाचा भक्तिमार्ग आहे.