Get it on Google Play
Download on the App Store

घटोत्कच

http://bharatdiscovery.org/bharatkosh/w/images/thumb/2/23/Ghatotkach-Karna.jpg/250px-Ghatotkach-Karna.jpg

असे म्हणतात की शरीरयष्टीने घटोत्कच इतका विशालकाय होता की तो केवळ लाथ मारून रथाला कित्येक फूट मागे ढकलून देत असे, आणि सैनिकांना तर तो आपल्या पायाखाली चिरडत असे. भीमाची असुर पत्नी हिडींबा पासून घटोत्कच जन्माला आला होता.

जन्माला आला त्यावेळी त्याच्या डोक्यावर केस नव्हते म्हणून त्याचे नाव घट (हत्तीचे मस्तक) + उत्कच (केसविरहित) म्हणजेच घटोत्कच ठेवण्यात आले. त्याचे मस्तक हत्तीच्या मास्ताकासारखे आणि त्यावर केस नसल्यामुळे तो घटोत्कच या नावाने प्रसिद्ध झाला. तो अत्यंत मायावी निघाला आणि जन्माला येताच मोठा झाला.

घटोत्कचाची माता एक राक्षसीण असल्यामुळे आणि पिता एक वीर क्षत्रिय असल्यामुळे त्याच्यात मनुष्य आणि राक्षस दोघांचेही मिश्र गुण उपस्थित होते. तो अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.

महाभारताच्या युद्धात त्याने हाहाःकार माजवला होता. कर्ण सेनापती बनून कौरवांकडून लढत होता. कर्णाच्या जवळ इंद्राने दिलेली अशी शक्ती होती ज्यामुळे तो पराक्रमीतील पराक्रमी योद्ध्याला मारू शकत होता. त्या शक्तीचा वार कधीच फुकट जाऊ शकत नव्हता. कर्णाला या शक्तीने अर्जुनाला मारायचे होते. कृष्णाला हे माहिती होते, म्हणूनच त्याने घटोत्कचाला रणांगणावर उतरवले. या राक्षसाने आकाशातून अग्नी आणि अने प्रकारची अस्त्रे शस्त्रे यांचा मारा सुरु केला ज्यामुळे कौरवांच्या सैन्यात हाहाःकार माजला. दुर्योधनाने घाबरून कर्णाला त्याला मारण्यास सांगितले. कर्ण देखील त्याच्या माराने घाबरला होता. त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिले की अशा प्रकाराने तर कौरवांची संपूर्ण सेना काही वेळातच संपून जाईल. तेव्हा नाईलाजाने कर्णाने त्या अमोघ शक्तीचा प्रयोग घटोत्कचावर केला. क्षणात घटोत्कच मृत होऊन जमिनीवर पडला. पांडवांना त्याच्या मृत्यूने दुःख जरूर झाले होते, परंतु कृष्णाने सर्व चाल त्यांना समजावून सांगितली आणि त्यांना संतुष्ट केले.