Get it on Google Play
Download on the App Store

सहदेव

पाच पांडवांपैकी दोघे नकुल आणि सहदेव दोन्ही माद्री-अश्विन कुमार यांचे पुत्र होते. सहदेवाला भविष्यात घडणारी प्रत्येक घटना अगोदरच माहिती होत असे. त्याला माहिती होते की महाभारत होणार आहे आणि कोण कोणाला मारेल आणि कोण विजयी होईल. परंतु भगवान कृष्णाने त्याला शाप दिला होता की जर त्याने याबाबतीत कोणाला काही सांगितले तर त्याचा मृत्यू होईल.

http://image.indiaopines.com/wp-content/uploads/2014/06/Sahadeva.jpg


कशी मिळाली शक्ती -
सहदेवाचे धर्मपिता पंडू अत्यंत ज्ञानी होते. त्यांची अंतिम इच्छा होती की त्यांच्या ५ मुलांनी त्यांचे मृत शरीर खावे जेणेकरून त्यांनी जे ज्ञान प्राप्त केले होते ते त्यांच्या पुत्रांना मिळावे. फक्त सहदेवाने हिम्मत दाखवून आपल्या वडिलांच्या इच्छेचे पालन केले. त्याने पित्याच्या मेंदूचे तीन हिस्से खाल्ले.  पहिला तुकडा खाताच सहदेवाला इतिहासाचे ज्ञान झाले, दुसरा तुकडा खाल्ल्यावर वर्तमानाचे आणि तिसरा तुकडा खाताच त्याला भविष्य दिसू लागले. अशा प्रकारे तो त्रिकालज्ञ बनला.