अश्वत्थामा
गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा प्रत्येक विद्येत पारंगत होता. त्याने मनात आणले असते तर पहिल्या दिवशीच युद्धाचा अंत करू शकला असता, परंतु कृष्णाने तसे कधीही होऊ दिले नाही. कृष्णाला हे माहिती होते की ही पिता-पुत्राची जोडी मिळून युद्धाचा अंत करू शकते.
एखादी व्यक्ती हजारो वर्षे जिवंत राहू शकेल ही गोष्ट विज्ञान मान्य करत नाही. जास्तीत जास्त कोणीही १५० वर्षे जिवंत राहू शकते ते देखील जर आरोग्य आणि खाणेपिणे उत्तम असेल तरच. मग हे कसे मान्य करता येईल की अश्वत्थामा जिवंत आहे? परंतु हे सत्य आहे की अश्वत्थामा आजही जिवंत आहे. इथे वाचा - हजारो वर्षांपासून जिवंत आहेत हे आठ महामानव...
का जिवंत आहे अश्वत्थामा? - महाभारताच्या युद्धात अश्वत्थामाने ब्रम्हास्त्र सोडले होते ज्यामुळे हजारो लोक मारले गेले होते. त्याच्या या कृत्याने अत्यंत चिडून कृष्णाने त्याला शाप दिला होता, की 'तू एवढ्या वधांचे पाप धुण्यासाठी ३ हजार वर्ष निर्जन स्थानी भटकत राहशील. तुझ्या शरीरातून सदैव रक्ताची दुर्गंधी येत राहील. तू अनेक रोगांनी ग्रासला जाशील.'
असे म्हणतात की या शापानंतर अश्वत्थामा वाळवंटी प्रदेशात निघून गेला आणि तिथेच राहू लागला होता. काही लोक म्हणतात की तो अरब देशांत निघून गेला होता. उत्तरप प्रदेशात मान्यता प्रचलित आहे की अरब देशांत जाऊन त्याने कृष्ण आणि पांडवांचा धर्म नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली होती.