Get it on Google Play
Download on the App Store

भीम

http://hindi.webdunia.com/hi/articles/1407/12/images/img1140712004_1_1.jpg

कुंती आणि वायूचा पुत्र होता भीम अर्थात पवनपुत्र भीम. युद्धामध्ये भिमापेक्षा देखील जास्त शक्तिशाली त्याचा पुत्र घटोत्कच होता. घटोत्कचाचा पुत्र बर्बरिक होता.

त्याने एकदा आपल्या हातांनी नर्मदेचा प्रवाह रोखला होता. भिमामध्ये हजार हत्तींचे बळ होते. पण भीमाच्या अंगी हे हजार हत्तींचे बळ कुठून आणि कसे आले?

हे सर्वांना माहिती आहे की गांधारीचा मोठा पुत्र दुर्योधन आणि भाऊ शकुनी हे दोघे कुंतीच्या पुत्रांना मारण्यासाठी नवीन नवीन योजना आखत असत. एका योजनेच्या अंतर्गत दुर्योधनाने धोक्याने भीमाला विष पाजून त्याला गंगा नदीत फेकून दिले होते. बेशुद्ध अवस्थेतच भीम वाहत जाऊन नाग लोकात पोचला. तिथे विषारी नाग त्याला खूप चावले ज्यामुळे त्याच्या शरीरातील विष कमी होऊ लागले, म्हणजेच विषाने विष मारले जाऊ लागले.

जेव्हा भीम शुद्धीवर आला, तेव्हा त्याने नागांना मारायला सुरुवात केली. ही बातमी नागराज वासुकी यांना समजली तेव्हा ते स्वतः भिमाकडे आले. वासुकीचा साथी आर्यक नागाने भीमाला ओळखले. आर्यक नाग भीमाच्या आजोबांचे आजोबा होते (आईच्या वडिलांच्या आईचे वडील). भीमाने त्यांना आपण धोक्याने गंगेत कसे वाहत आलो त्याचा किस्सा सांगितला. हे ऐकून वासुकी नागाने भीमाला हजारो हत्तींचे बळ देणाऱ्या कुंडातील रस पाजवला, ज्यामुळे भीम आणखीनच शक्तिशाली बनला.