एफ आय आर
पोलीस अधिकारी तुमची तक्रार लिहून घेण्यास नकार देऊ शकत नाही. भा.दं.वि. (आय.पी.सी.) कलम १६६ ए नुसार कोणताही पोलीस अधिकारी तुमची कोणतीही तक्रार लिहून घेण्यास नकार देऊ शकत नाही. जर कोणत्याही अधिकाऱ्याने असे केले तर त्याच्याविरुद्ध वरिष्ठ पोलीस कार्यालयात तक्रार नोंदवता येऊ शकते. जर संबंधित अधिकारी दोषी ठरला तर त्याला कमीत कमी ६ महिने ते १ वर्ष एवढी शिक्षा होऊ शकते किंवा त्याला आपली नोकरी गमवावी लागू शकते.