सिलेंडरचा स्फोट झाल्यास 40 लाखांचा विमा
घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन काही जीवित किंवा वित्त हानी झाली तर तुम्ही ४० लाख रुपयांपर्यंत विमा रकमेची मागणी करू शकता. पब्लिक लायबिलिटी पॉलिसी अंतर्गत जर काही कारणाने तुमच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाला आणि तुम्हाला काही जीवित किंवा वित्त हानी सोसावी लागली तर त्वरित तुम्ही गैस कंपनीकडून विमा संरक्षण वसूल करू शकता. लक्षात ठेवा, गैस कंपनीकडून ४० लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम वसूल केली जाऊ शकते. जर कंपनीने तुम्हाला विमा रक्कम देण्यासाठी नकार दिला किंवा टाळाटाळ केली तर यासंबंधी तक्रार करता येऊ शकते. दोष सिद्ध झाल्यास गैस कंपनीचा परवाना रद्द होऊ शकतो.