मोफत पाणी आणि स्वच्छता गृह
कोणतेही हॉटेल, मग ते पंचतारांकित का असेना, तिथे तुम्ही मोफत पाणी पिऊ शकता आणि तिथले स्वच्छता गृह मोफत वापरू शकता. इंडियन सीरीज एक्ट, 1887 नुसार तुम्ही देशातील कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन मोफत पाणी मागून पिऊ शकता आणि त्या हॉटेलचे स्वच्छता गृह वापरू शकता. हॉटेल छोटे असेल किंवा अगदी पंचतारांकित, ते तुम्हाला या दोन गोष्टींपासून अडवू शकत नाहीत. जर हॉटेलचा मालक किंवा कोणताही कर्मचारी तुम्हाला पाणी पिण्यापासून किंवा स्वच्छता गृह वापरण्यास विरोध करत असेल तर तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता. तुमच्या तक्रारीने संबंधित हॉटेलचा परवाना देखील रद्द होऊ शकतो.