Android app on Google Play

 

पितरांचा परिचय

 

पुराणानुसार मुख्यतः पुतरांच्या दोन श्रेण्या असतात- दिव्य पितर आणि मनुष्य पितर. मनुष्याच्या कर्मानुसार मृत्यूपश्चात त्याला काय गती दिली जावी हे दिव्य श्रेणीत ठरवलं जातं. या श्रेणीचे प्रधान यमराज आहेत.

चार व्यवस्थापक-
यमराजाची गणनासुद्धा पितरांमधये होते. काव्यवाडनल, सोम, अर्यमा आणि यम हे चार या श्रेणीचे मुख्य गण-प्रधान आहेत. अर्यमाला पितरांचे प्रधान आणि यमराजाला न्यायाधीश मानले गेले आहे.
या चारांशिवाय प्रत्येक वर्गाची पेशी करणारे-
यथा- अग्निष्व- देवांचे प्रतिनीधी, सोमसद किंवा सोमपा- साधूंचे प्रतिनीधी, बहिर्पद- गंधर्व, राक्षस, किन्नर सुपर्ण, सर्प आणि यक्षांचे प्रतिनीधी.
यासगळ्यानी संघटीत श्रेणी म्हणजे पितर होय. मृत्यूनंतर हेच न्यायनिवाडा करतात.
 
दिव्य पितरांच्या श्रेणीचे सदस्य- अग्रिष्वात्त, बहिर्पद आज्यप, सोमेप, रश्मिप, उपदूत, आयन्तुन, श्राद्धभुक व नांदीमुख हे नऊ दिव्य पितर सांगितले गेले आहेत. आदित्य, वसु, रुद्रआणि दोन अश्विनीकुमार देखील नांदीमुख सोडून इतर पितरांना तृप्त करतात.