Get it on Google Play
Download on the App Store

यमाचं पहिलं मंदिर- भरमौर- हिमाचल

यमाला समर्पित हे मंदिर हिमाचलातल्या चंबा जिल्ह्यात भरमौर नावाच्या ठिकाणी आहे. हे मंदिर दिसायला एका घरासारखंच दिसतं. या मंदिरात एक रिकामी खोली देखील आहे जिला चित्रगुप्ताची खोली असं म्हटलं जातं.

यामंदिराबद्दल असं सांगितलं जातं की जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा यमराज त्या व्यक्तीचा/प्राण्याचा आत्मा आधी या मंदिरात आणून चित्रगुप्समोर सादर करतात.चित्रगुप्त त्या आत्म्याला त्याच्या कर्माबद्दल माहिती देतात. नंतर यमराज त्या आत्म्याला या खोलीच्या समोरच्या दुसऱ्या कक्षात नेतात जो यमाचा कक्ष म्हणूनच ओळखला जातो.
 
इथे यमराज त्या आत्म्याचा त्याच्या कर्मांनुसार निर्णय घेतात. असंही म्हटलं जातं की या मंदिराचे चार अदृश्य दरवाजे आहेत जे सोने, लोखंड, तांबे आणि चांदीचे आहेत. यमराजाचा निर्णय आला की यमदूत त्या आत्म्याला त्याच्या कर्मानुसार यांपैकी एका दारातून स्वर्गात किंवा नर्कात पाठवतात. गरूडपुराणातही यमाच्या दरबारात अश्या चार दारांचा उल्लेख आढळतो.