Get it on Google Play
Download on the App Store

कोण आहे यमराज?

कोण आहे यमराज?
मार्कंडेय पुराणानुसार यमराज हे दक्षिण दिशेचे पालक आणि मृत्यूची देवता आहेत.  दहा दिशांचे दिशापाल पुढीलप्रमाणे-
इंद्र, अग्नि, यम, नऋती, वरूण, वायु, कुबेर, अनंत आणि ब्रह्म.
 
यमराजाचे कुटूंब-
विश्वकर्माची मुलगी संज्ञा हीच्या गर्भातून उत्पन्न झालेल्या सुर्याच्या मुलाला यम म्हटलं जातं. त्याच्या पत्नीचं नाव यमी आहे. त्याचे शस्त्र, शिक्षा आणि वाहन हे रेडा आहे.  चित्रगुप्त हे त्याचे सहकारी आहेत. त्याच्या वडिलांचं नाव सुर्य, बहिणीचं नाव यमुना आणि भावाचं नाव श्राद्धदेव मनु असं आहे.
 
यमराजाचे रूप-
यमाचं पुराणांमध्ये विचीत्र वर्णन केलं गेलं आहे. त्यानुसार यमराज हे हिरव्या रंगाचे होते आणि लाल वस्त्र परिधान करायचे. रेडा हे त्यांचे वाहन होते व त्यांच्या हातात गदा असायची.
 
यमाचे सहकारी-
चित्रगुप्त हे यमराजाचे लिपीक आहेत जे सर्व प्राणीमात्रांचे कर्म आणि पाप-पुण्य याची नोंद ठेवतात. चित्रगुप्ताच्या अग्रसंधानी या वहीत या सर्वांचे हिशोब ठेवले जातात.
 
यमाचं नाव-
यम याचा अर्थ नियंत्रण किंवा संयम असा होतो. मृत्युची देवता समराज हिला धर्मराज असंही संबोधलं जातं. यमाराजाला पितृपति, कृतांत,शमन, काल, दंडधर, श्राद्धदेव, धर्म, जीवितेश, महिषध्वज, महिषवाहन, शीर्णपाद, हरि आणि  कर्मकर अशा विविध विशेषणांनी संबोधलं जातं. इंग्रजीत यमाला प्लुटो असेही म्हणतात. एका धर्माश्त्राचं नावही यम असे आहे.
 
यम किती आहेत-
आपल्याकडे १४ यम मानले जातात- यम, धर्मराज, मृत्यू, अंतक, वैवस्तव, सर्वभुतक्ष, औदुंबर, दध्न, नील, परमेष्छी, वृकोदर, चित्र आणि चित्रगुप्त.
धर्मशास्त्र संग्रहानुसार या १४ यमांना त्यांच्या नावाने ३-३ अंजली जल तर्पणात देतात.