Android app on Google Play

 

अन्य मंदिरं

 

श्री यमा धर्मराज मंदिर-
हे मंदिर तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात आहे. हे मंदिर १००० ते २००० वर्ष जुनं असल्याचं म्हटलं जातं.

वाराणसीचे धर्मराज मंदिर-
काशीमध्ये यमाशी संबंधित ऐकिवात नसलेली बरीच माहिती मिळते. मीर घाटावर आनादिकालापासून धर्मेश्वर महादेवाचं मंदिर आहे जिथे यमराजाने शंकराची आराझना केली होती. असं म्हणतात की यमाला यमराज ही उपाधी इथेच मिळाली. धर्मराज युधिष्ठीर याने अज्ञातवासादरम्यान इथे शंकराची पुजा केली होती. या मंदिरीचा इतिहास पृथ्वीवर गंगा अवतार घ्यायच्या आधीचा आहे, ज्याचे काशी खंडातही वर्णन सापडते.

चित्रगुप्त आणि यमराज मंदिर- कोईंबतूर-
हे मंदिर तमिळनाडूतील कोईंबतूरच्या वेल्लालूर मेनरोड वर सिंगानल्लूरमधे आहे. इथे एक अत्यंत सुंदर झरा देखील आहे