Android app on Google Play

 

या युद्धापासून शिकलेल्या सैनिकी रणनीती

 

 • हत्यारबंद वाहनांचा उपयोग
  या युद्धाच्या दोन चरणांत हत्यारबंद वाहने आणि कमी वजनाच्या रणगाड्यांचा वापर अत्यंत महत्वपूर्ण होता. दोन्हीमध्ये खूपच कमी प्रमाणात यांचा प्रयोग करण्यात आला होता. हे चरण होते श्रीनगरवर प्रारंभिक हल्ला नाकाम करणे ज्यामध्ये भारताच्या २ हत्यारबंद वाहनांनी पाकिस्तानच्या अनियमित सैनिकांच्या तुकडीवर पाठीमागून हल्ला केला.
  या घटना हेच सांगतात की असंभव जागांवर हत्यारबंद वाहनांचा प्रयोग केल्यास शत्रूवर मानसिक दबाव पडतो. असे देखील असू शकेल की हल्लेखोरांनी टैकरोधी हत्यारांचा उपयोग केला नाही, कदाचित त्यांची आवश्यकता नाही असे मानून त्यांनी ती उपकरणे मागे सोडून दिली असावीत. हत्यारबंद वाहनांच्या प्रयोगाने भारताच्या युद्ध्नितीवर खोल प्रभाव पडला. चीन युद्धात भारतीयांनी खूप मेहनतीने दुर्गम भागात हत्यारबंद वाहनांचा प्रयोग केला परंतु त्या युद्धात या वाहनांना अपेक्षित सफलता मिळाली नाही.


 • सीमारेषेत झालेले बदल
  सीमारेषेत झालेल्या बदलाचे जर परीक्षण केले तर खूप रोचक तथ्य समोर येतात. एकदा सैन्य जमवून झाल्यानंतर नियंत्रण रेषेत बदल होणे खूप संथ झाले आणि विजय केवळ त्या प्रदेशांपुरता सीमित झाला जिथे सैन्याचे प्रमाण कमी होते, जसे उत्तर हिमालयातील उंच ठिकाणे जिथे सुरुवातीला आजाद काश्मीरच्या सेनेला यश मिळाले होते. १९४८ मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण करून त्यांच्या एक तृतीयांश भागावर कब्जा केला होता. आजपर्यंत हा एक तृतीयांश भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे.


 • सैन्याची तैनाती
  जम्मू आणि काश्मीरची सेना या युद्धाच्या प्रारंभी विखुरलेली आणि छोट्या संख्येने, केवळ दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यापुरती तैनात होती. ज्यामुळे पारंपारिक सैनिकी हल्ल्यापुढे ती निष्प्रभ ठरली. या रणनीतीचा प्रयोग भारताने पूर्व पाकिस्तान (बांग्लादेश) मध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या युद्धात यशस्वीपणे केला.