सुरुवातीचा हल्ला (गुलमर्गचे अभियान)
सुरुवातीच्या हल्ल्याचा मुख्य उद्देश काश्मीर घाटी आणि तिथले प्रमुख शहर श्रीनगरला आपल्या हातात घेणे हा होता. जम्मू आणि काश्मीर प्रदेश (आता राज्य) ची ग्रीष्मकालीन राजधानी श्रीनगर आणि शीतकालीन राजधानी जम्मू होती. मुजफ्फराबाद आणि डोमेल मध्ये तैनात राज्याची सेना लगेचच आजाद काश्मीर नावाच्या पाकिस्तानी सेनेकडून पराभूत झाली ( सैन्याची एक तुकडी आजाद काश्मीरच्या सेनेला जाऊन मिळाली होती.) आणि श्रीनगरचा मार्ग खुला झाला होता. काश्मीरची सेना पुन्हा संघटीत होण्यापूर्वी श्रीनगरवर कब्जा करण्याच्या ऐवजी आजाद काश्मीर सेना सीमांत शहरांवर कब्जा करणे आणि तिथल्या गैर-मुस्लीम नागरिकांना लुटणे आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यात गढून गेली. पुंछ च्या घाटीतून काश्मीरचे सैन्य माघार घेऊन शहरांमध्ये केंद्रित झाले आणि आणि त्यांना कित्येक महिन्यांनतर भारतीय सैन्याने घेरा बंदीपासून मुक्त केले.