Android app on Google Play

 

कश्मीर घाटीमधले भारतीय सुरक्षातंत्र

 

जम्मू आणि काश्मीर संस्थानाच्या भारतात विलीनीकरणानंतर भारताने सैन्य आणि उपकरणे श्रीनगरला पोचवली. तिथे पोचल्यावर त्यांनी काश्मीरच्या सेनेला मजबूत केले आणि श्रीनगरच्या चहुबाजूला संरक्षक कडे बनवले आणि आजाद काश्मीर सेनेला पराभूत केले. या सुरक्षा कड्यात भारतीय सेनेच्या हत्यारबंद वाहनांकडून शत्रूला पाठीमागून घेरणे देखील समाविष्ट होते. पराभूत होऊन पळून जाणाऱ्या पाकिस्तानी सेनेचा बारामुल्ला आणि उरी पर्यंत पाठलाग करून या दोन शहरांना मुक्त करण्यात आले परंतु पुंछ घाटी मध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शहरांना वेढा घालणे चालूच राहिले.
गिलगीत मध्ये आजाद काश्मीरच्या सेनेत गिलगीत राज्याचे अर्ध सैनिक बल देखील सामील झाले आणि चित्रालच्या मेहतर जहागीरदाराची सेना देखील आपली जहागीर पाकिस्तान मध्ये विलीन झाल्याची घोषणा केल्यानंतर आजाद काश्मीर सेनेत सामील झाली.