पुंछ मध्ये अडकलेल्या सैन्यापर्यंत पोचण्याचा प्रयास
उरी आणि बारामुल्ला वर कब्जा केल्यानंतर भारतीय सेनेने आजाद काश्मीर सेनेचा पाठलाग करणे बंद केले आणि एक सहाय्यक तुकडी दक्षिणेला पुंछचा वेढा फोडण्यासाठी पाठवली. ही तुकडी पुंछला पोचली परंतु वेढा फोडू शकली नाही आणि तिथेच अडकून पडली. एक दुसरी सहाय्यक तुकडी कोटली पर्यंत पोचली परंतु तिला आपली कोटलीची मोर्चाबंदी सोडून मागे हटावे लागले आणि याच दरम्यान मिरपूरवर आजाद काश्मीर सेनेने कब्जा केला.