Android app on Google Play

 

पार्श्वभूमी

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रथम युद्ध सन १९४७ मध्ये झाले होते. हे युद्ध काश्मीर प्रश्नावरून झाले होते जे १९४७-४८ च्या दरम्यान चालले.
१८१५ च्या आधी आजचे हे "काश्मीर" क्षेत्र "पंजाब पहाडी राज्य" म्हणून  ओळखण्यात येत असत आणि यामध्ये २२ छोटी छोटी स्वतंत्र राज्य समाविष्ट होती. या छोट्या राज्यांमध्ये राजपूत राजा (जे मुघलांशी इमान राखून होते) राज्य करत होते. प्रत्यक्षात या पंजाबच्या पहाडी राज्यांचे राजपूत मुघल साम्राज्याची एक प्रमुख शक्ती होते आणि त्यांनी शिखांच्या विरोधात मुघल साम्राज्याच्या समर्थनार्थ अनेक लढाया लढल्या होत्या. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा उदय आणि मुघल साम्राज्याचे नंतरचे पतन यानंतर या पहाडी राज्यांची सत्ता शीख नाकारू लागले. त्यामुळे शीख गुरू महाराजा रणजीत सिंह या छोट्या राज्यांवर विजय प्राप्त करण्यासाठी रवाना झाले. शेवटी एका मागोमाग एक असे करत सर्व पहाडी राज्यांवर महाराजा रणजीत सिंह यांनी विजय संपादन केला आणि त्या सर्वांना एका राज्यात विलीन करून त्या राज्याला जम्मूचे राज्य म्हटले जाऊ लागले.
जे. हचिंसंन आणि जे. पी. वोगेल द्वारा लिखित पंजाब जातींच्या इतिहासात दिलेल्या वर्णनानुसार या २२ राज्यांमध्ये १६ राज्य हिंदू होती आणि ६ राज्य मुसलमान होती. या ६ मुस्लीम राज्यांमध्ये (कोटली आणि पुंछ) मंग्रालो दोन (भीमबेर आणि खारी-खैरियाला) छिब्ब द्वारे राजौरी जरालो द्वारे आणि किश्तवाड वर किश्तवाडीयांकडून शासन केले जात असे.
पहिले ब्रिटीश - शीख युद्ध शीख साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात १८४५ आणि १८४६ मध्ये लढले गेले, नंतर १८४६ मध्ये लाहोरच्या तहात शिखांना १२ लाख रुपयांची नुकसान भरपाई करण्याची आवश्यकता होती. परंतु शीख एवढी रक्कम नुकसानभरपाईपोटी भरू शकले नाहीत, म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने डोगरा शासक गुलाब सिंह याला ७,५०,००० रुपये भरपाई करण्याच्या बदल्यात शीख राज्याकडून काश्मीर प्राप्त करून घेण्याची अनुमती दिली. गुलाब सिंह काश्मीर राज्याचे संस्थापक बनून नवगठीत राजसी राज्याचे प्रथम महाराजा बनले. जम्मू आणि काश्मीरचे राज्य १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ब्रिटीश राजवटीच्या दरम्यान दुसरे सर्वांत मोठे राज्य होते.