भारतीय सेनेचे बसंत अभियान
1 मे 1948 - 19 मे 1948
आजाद काश्मीर सेनेच्या अनेक प्रती आक्रमणांनंतर देखील भारताने झांगेर वर नियंत्रण कायम ठेवले. आता आजाद काश्मीर सेनेला पाकिस्तानी सेनेकडून नियमितपणे अधिकाधिक मदत मिळू लागली होती. काश्मीर घाटीमध्ये भारतीयांनी आक्रमण करून तिथवाल वर कब्जा केला. हिमालयाच्या उंच भागात आजाद काश्मीर सेनेला चांगले यश मिळत होते. त्यांनी तुकड्या घुसवून कारगिलला वेढा घातला आणि स्कार्दूची मदत करण्यासाठी जाणाऱ्या भारतीय सैन्याच्या तुकड्यांना पराभूत केले.
भारतीय सेनेने काश्मीर घाटीमध्ये हल्ला चालू ठेवला आणि उत्तरेला आगेकूच करून केरान आणि गुराऐस वर कब्जा केला. त्यांनी तिथवाल वरील प्रती आक्रमण उखडून लावले. पुंछ घाटीमधे पुंछ मध्ये अडकलेली काश्मीर संस्थानाची तुकडी गिलगित स्काउट (पाकिस्तान) पासून स्कार्दूचे संरक्षण करण्यात आतापर्यंत यशस्वी झाली होती त्यामुळे पाकिस्तानी सेना लेहच्या दिशेने पुढे जाऊ शकत नव्हती. ऑगस्ट मध्ये चित्राल (पाकिस्तान) च्या सैन्याने माता-उल-मुल्क़ च्या नेन्तृत्वाखाली स्कार्दूवर हल्ला केला आणि तोफखान्याच्या मदतीने स्कार्दूवर कब्जा केला. त्यामुळे गिलगित स्काउटला लडाख च्या दिशेने आगेकूच करण्याची संधी मिळाली.