चन्द्र
चंद्राच्या कला या वेळेच्या क्रमाने वाढत आणि घटत राहतात; परंतु चंद्राचे वास्तव स्वरूप स्थिर राहते. त्याचप्रकारे मनुष्याच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्युपर्यंत शरीराच्या अवस्था बदलत राहतात. परंतु आत्म्याचे स्वरूप अपरिवर्तित राहते. मृत्यू झाल्यामुळे केवळ शरीराचा नाश होतो. आत्मा सदैव स्थिर राहतो.