Get it on Google Play
Download on the App Store

*कलिंगडाच्या साली 27

कुSठें राहातोस, कुSठें झोपतोस ?”

“असाच कुठेंतरी राहातों नि झोंपतों. स्टेशन हेंच घर. सकाळी एखाद्या सार्वजनिक नळावर अंघोळ करतों, कपडे वाळवतो. स्टेशनांत बाकावर येऊन पडतों. कधीं राणीच्या बागेंत बसतो. कारण स्टेशनांत तरी कोण निSजूं देतो! अशीं मोठीं माणसे येतात. हजारों रुपयांची त्यांना जागा हवी. या मुलाला रात्रपाळी असेल, झोपायला जागा नसेल, थकून-भागून येथें झोपला असेल, असा विचार कोण करणार, दादा ?”

तो मुलगा कसें बोलत होता म्हणून सांगूं ! साधें सरळ सत्यकथन ! जगावर राग ना रुसवा. स्टेशनांत एक केळेविक्या बसला होता. पटकन् गेलो नि दोन आण्यांची केळी घेऊन आलो.

“घे.” मी त्याला म्हटलें.
“कशाला आणलींत ?”
“दुसरें काय देऊं ?”

तुम्ही त्या दिवसीं ते चार आणे दिलेत, तेच लाखांच्या ठिकाणीं. त्या दिवशी मी गळून गेलो होतो. तुम्ही अन्नदाते भेटलांत. तुम्ही सारें काहीं दिलेंत. सहानुभूति दिलीत. खरें ना ? गरिबाबद्दल कुणाला आहे आस्था ? कोण करतो त्यांच्या सुखदु:खाचा विचार! कधी संपतील हे गरिबांचे हाल ?”

“जेव्हा समाजवाद येईल तेव्हां.”
“कधीं येईल ?”

तुम्ही आणाल तेव्हां. तो का आकाशांतून पडणार आहे ? तुझ्यासारख्या तरुण मुलांनी अभ्यास करायला हवा, संघटनेत सामील व्हायला हवें. कधीं गांवी गेलास तर तेथेहि हे विचार न्यायला हवेत. आपल्यासाठी दुसरा कोण काय करणार ? “तुम्ही मला सोपी सोपी पुस्तके द्याल ?”
“तूं किती शिकलास ?”
“चार बुकें शिकलों. वाचता येतें.”
“जनवाणी वाच, साधना वाच.”
“तुम्ही कुठें भेटत जाल ?”
मी त्याला माझा पत्ता दिला. इतक्यांत गाडी आली.
“मी जातों. तुझें नांव काय ?”
“रामकृष्णा.”
“जातों, रामकृष्ण. सुखी रहा.”
“तुमचा समाजवाद येईल तेव्हां खरा सुखी होईन. कारण मग सर्वांच्या सुखाचा प्रश्न सुटेल.” तो मजकडे पाहून म्हणाला.

कलिंगडाच्या साली

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
हिमालयाची शिखरे 15 *कलिंगडाच्या साली 1 *कलिंगडाच्या साली 2 *कलिंगडाच्या साली 3 *कलिंगडाच्या साली 4 *कलिंगडाच्या साली 5 *कलिंगडाच्या साली 6 *कलिंगडाच्या साली 7 *कलिंगडाच्या साली 8 *कलिंगडाच्या साली 9 *कलिंगडाच्या साली 10 *कलिंगडाच्या साली 11 *कलिंगडाच्या साली 12 *कलिंगडाच्या साली 13 *कलिंगडाच्या साली 14 *कलिंगडाच्या साली 15 *कलिंगडाच्या साली 16 *कलिंगडाच्या साली 17 *कलिंगडाच्या साली 18 *कलिंगडाच्या साली 19 *कलिंगडाच्या साली 20 *कलिंगडाच्या साली 21 *कलिंगडाच्या साली 22 *कलिंगडाच्या साली 23 *कलिंगडाच्या साली 24 *कलिंगडाच्या साली 25 *कलिंगडाच्या साली 26 *कलिंगडाच्या साली 27 *कलिंगडाच्या साली 28 *कलिंगडाच्या साली 29 *कलिंगडाच्या साली 30 *कलिंगडाच्या साली 31 *कलिंगडाच्या साली 32 *कलिंगडाच्या साली 33 *कलिंगडाच्या साली 34 *कलिंगडाच्या साली 35