Get it on Google Play
Download on the App Store

टेस्ला आणि कॉन्स्पीरसी थिअरी




निकोला टेस्ला यांनी आपल्या जीवनाला वर्तमान आकार देण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या संशोधनानी आणि शोधांनी आपले आयुष्य बदलून टाकले आहे. परंतु त्यांना एक सणकी वैज्ञानिक देखील मानले जाते. त्यांनी अनेक विचित्र आणि अव्यावहारिक संकल्पनांवर देखील काम केले आहे, ज्यापैकी एक बिनतारी उर्जा संचार प्रणाली, मृत्यू किरणज (Death ray) सारख्या हत्याराचा देखील समावेश आहे. त्या काळातील अन्य प्रसिद्ध वैज्ञानिक जसे एडिसन, विलियम क्रूक यांच्या प्रमाणे टेस्ला देखील असामान्य गोष्टी जसे आत्म्यांचे जग, परग्रही जीवांचे पृथ्वीवरील अस्तित्व यांच्याव विश्वास ठेवत असत. त्यांच्या अनेक विचित्र, सणकी सवयी होत्या. ३ या अंकावर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांना अनेक गोष्टींची भीती वाटत असे. आता असे मानले जाते की ते एक मनोविकार Obsessive–compulsive disorder /OCD या आजाराने ग्रस्त होते. हा आजार त्यांच्या सारख्या वैज्ञानिकांमध्ये सामान्य आहे. टेस्ला इतके यशस्वी वैज्ञानिक होते की त्यांच्या काही कल्पना ज्या वैज्ञानिक, सैद्धांतिक, व्यावहारिक स्वरूपाने अनाम्भाव असून देखील केवळ त्यांच्या नावाशी निगडीत असल्याने चांगले शिक्षण न मिळालेल्या व्यक्तींसाठी आकर्षणाचे केंद्र होते आणि आजही आहे. काही प्रकाराने अशीही झाली आहेत की छद्मी वैज्ञानिक आणि धोकेबजांनी टेस्ला यांच्या नावाचा उपयोग करून खऱ्या खोट्या प्रयोगांच्या आणि उपकरणांच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला होता.

टेस्ला अनेक कॉन्स्पीरसी थिअरीज चे केंद्र राहिले आहेत. त्यांच्या नुसार त्यांचा मृत्यू हा संशयास्पद होता आणि त्यांच्या मृत्यू पश्चात अमेरिका सरकारने त्यांचे संशोधन आणि उपकरणे स्वतःच्या ताब्यात घेऊन सर्व सामान्य जनतेपासून लपवून ठेवली आहेत. काही जन तर असे म्हणतात की त्यांचा मृत्यू हा केवळ अमेरिकन सरकारचा एक बनव होता आणि त्यानंतर ते अनेक वर्ष गुप्तपणे अमेरिकन सरकार साठी काम करत राहिले.
फिलाडेल्फीया एक्सपेरीमेंट च्या नावाने कुख्यात कॉन्स्पीरसी थिअरी ज्यामध्ये टेलीपोर्टेशन किंवा समययात्रा च्या पायोगाचा दावा केला जातो, या थिअरी च्या समर्थकांचे मानाने आहे की त्यामागे टेस्ला यांची बुद्धी आणि उपकरणे होती.
असे देखील मानले जाते की टेस्ला यांना त्यांचे कार्य आणि प्रयोग यांचे योग्य श्रेय मिळाले नाही आणि अमेरिकन सरकारने त्यांचे अनेक प्रयोग दाबून ठेवले आहेत. ही गोष्ट सत्य आहे की एडिसन च्या मनात टेस्ला बद्दल वैर भावना होती आणि पेटंट विभागाने देखील रेडियो च्या शोधाचे पेटंट टेस्ला ऐवजी मार्कोनी याला दिले होते. परंतु हे सर्व इथपर्यंतच सीमित आहे. विज्ञान जगताने टेस्ला यांचा योग्य सन्मान केला आहे. चुंबकीय प्रभावाचे युनिट टेस्ला त्यांच्याच सन्मानार्थ आहे.