टेस्ला आणि एडिसन
टेसला यांचे शोध एडिसन यांच्यापेक्षा कमी नव्हते. परंतु या शांत राहणाऱ्या व्यक्तीमध्ये एडिसन प्रमाणे चुंबकीय आकर्षण नव्हते. टेस्ला विज्ञानाला समाजत होते, सामाजिक व्यवहार त्यांना कळत नव्हते, म्हणूनच एडिसन जेवढे प्रसिद्ध झाले, तेव्हढी प्रसिद्धी टेस्ला मिळाली नाही.
एडिसन यांच्याशी त्यांचे शत्रुत्व हा संपूर्ण विज्ञान जगतात चर्चेचा विषय होता. अर्थान त्यांनी एडिसन साठी काम देखील केले. टेस्ला यांनी एडिसन समोर त्यांची मोटार आणि जनरेटर जास्त प्रभावी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. एडिसन यांनी टेस्ला न असे सांगितले की जर त्यांनी असे करून दाखवले तर त्यांना ५०००० डॉलर मिळतील. टेस्ला यांनी तसे करून दाखवले परंतु एडिसन यांनी त्यांचा शब्द फिरवला. एडिसन यांनी आपले वाचन हे अमेरिकन हास्य (American Humor) आहे असे सांगून टेस्ला यांची चेष्टा केली. तेव्हा रागाने टेस्लानि एडिसन ची सोबत सोडून दिली.
तो काळ होता एडिसन च्या DC current च्या टेस्ला यांच्या AC current शी लढाई चा. एडिसन ने प्रत्यावर्ती प्रवाहाचे भय उत्पन्न करण्यासाठी प्रत्येक साधनाचा उपयोग केला. एवढेच नव्हे तर चक्क एका हत्तीला लोकांच्या समोर विजेच्या झटक्याने मारून टाकले आणि AC ची विनाशकारी शक्ती दाखवली. परंतु प्रत्येक घरात्त वीज ही केवळ AC प्रवाहानेच पोहोचू शकत होती. त्यामुळे शेवटी टेस्ला यांचाच विजय झाला. त्या काळी अमेरिकेत एडिसन ने शिध लावलेली DC विद्युत वितरण व्यवस्था कार्यरत होती. DC म्हणजेच Direct current अशा विद्युत प्रवाहाला म्हणतात जो नेहमी एकाच दिशेने वाहतो. ज्याप्रमाणे विद्युत सेल मधून निर्माण होणारा प्रवाह. टेस्ला यांनी DC मधल्या त्रुटी लोकांना दाखवून दिल्या आणि AC विद्युत वितरण व्यवस्था लागू करण्याचा विषय बोलून दाखवला. AC म्हणजेच Alternative current सारखी आपल्या प्रवाहाची दिशा बदलत असते. या प्रवाहाचे वैशिष्ट्य असे की याचे वोल्टेज ट्रांसफोर्मर द्वारा वाढवून खुप दूर पर्यंत पाठवता येऊ शकते. DC मध्ये असे करता येत नाही. त्याच बरोबर AC प्रणालीवर चालणारी उपकरणे DC उपकरणांच्या तुलनेत कमी वीज वापरतात.
त्या वेळी DC system प्रचंड मोठ्या प्रमाणावर लागू होती आणि एडिसन कंपनी DC उपकारानेच बनवत होती, त्यामुळे एडिसन ने या नवीन पद्धातीला विरोध केला. परिणाम म्हणून टेसला यांनी एडिसन च्या कंपनीला निरोप दिला आणि उद्योगपति जॉर्ज वेस्टिंग हाउस याच्या सोबत नवीन कंपनी चालू केली. या कंपनीने AC प्रणालीचे महत्त्व जगाच्या समोर ठेवले.
टेस्ला यांनी चक्रीय चुंबकीय क्षेत्राच्या सिद्धांताचा शोध लावला. त्यांचा एक आणखी महत्वपूर्ण अविष्कार म्ह्जंजे एसी विद्युत मोटार (AC Electric Motor) आहे ज्याने DC विद्युत प्रणालीला पूर्णपणे मार्जीनल बनवले. त्याने नायगारा धबधब्यावर पहिले जल विद्युत पावर स्टेशन (Water electric power station) तयार केले, ज्यानंतर केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगानेच AC विद्युत वितरण प्रणालीचा स्वीकार केला.
१८८७ मध्ये टेस्ला यांनी AC current वर चालणारी इंडक्शन मोटार बनवली, या आविष्काराने टेस्ला यांच्यासाठी प्रगतीची दारे खुली केली. यानंतर टेस्ला आणि एडिसन यांच्यात AC current आणि DC current यांच्यावरून लढाई चालू राहिली. परंतु शेवटी टेस्ला यांचा AC current विजयी झाला कारण तो दूर अंतरापर्यंत विजेच्या वाहनाला उपयुक्त होता.
असे मानले जाते की टेस्ला यांनी रांटजेन यांच्या अगोदर १८९५-९६ मध्ये क्ष किरणांचा शोध लावला होता होता. परंतु त्यांच्या प्रयोगशाळेत लागलेल्या आगीत सर्व कागदपत्र आणि उपकरणे जाळून खाक झाले.