जन्म
टेस्ला यांचा जन्म १० जुलै १८५६ रोजी सर्बियन माता पिता मिलुतीन टेस्ला आणि ड्युका टेस्ला यांच्या परिवारात ऑस्ट्रियन स्टेट (आता क्रोएशिया) मध्ये झाला होता. १८७० मध्ये निकोला टेस्ला यांनी कार्लोवेक स्कूल मध्ये प्रवेश घेतला आणि त्या शाळेत ते आपले गणित शिक्षक मार्टिन सेकुलिक यांच्यामुळे खूपच प्रभावित झाले होते. टेस्ला त्या वेळी एकत्रीकरण (Integral Calculus) च्या प्रश्नांना मनातल्या मनात सोडवण्यात सक्षम होते. त्यांच्या शिक्षकांचा त्यांच्यावर विश्वास बसत नसे परंतु त्यांनी आपला ४ वर्षांचा अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांत पूर्ण केला होता. १८७५ मध्ये त्यांनी ऑस्ट्रियन पॉलीटेक्निक मध्ये प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी सर्व वर्गाना उपस्थित राहिले. नऊ परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि प्रत्येकात सर्वोत्तम शक्य गुण प्राप्त केले.