अविष्कार
१८८१ मध्ये त्यांनी बुडापेस्ट येथे एका टेलिग्राफ कंपनी " बुडापेस्ट टेलिफोन एक्स्चेंज" मध्ये विद्युत अभियंता या पदावर नोकरी केली. या पदावर असताना त्यांनी केंद्रीय संचार उपकरणांत अनेक सुधारणा केल्या आणि टेलिफोन एम्प्लीफायर नवीन रुपात बनवला. परंतु त्याचे पेटेंट त्यांनी घेतले नाही. निकोला टेस्ला यांनी आपल्या जीवनकाळात ३०० पेटंट प्राप्त केले. परंतु त्यांच्या व्यतिरिक्त त्यांनी असे कित्येक अविष्कार घडवले आहेत ज्यांचे त्यांनी पेटंट घेतलेले नाही.
टेसला यांचे काही महत्त्वाचे शोध खालीलप्रमाणे आहेत.
AC Current
टेस्ला वेव्हज (Electric waves)
विजेवर चालणारी मोटार (जिच्यावर प्रत्येक विजेवर चालणारी गोष्ट अवलंबून आहे)
वायरलेस संचार
रोबोटिक्स, रिमोट कंट्रोल, रडार.