इतर अविष्कार
मार्कोनी याला रेडियोचा जनक मानले जाते. परंतु सत्य आहे की या शोधात टेस्ला यांचे योगदान कमी नाही. त्यांनीच हा सिद्धांत मांडला की वातावरणाच्या बाहेर आयन मंडळातून होऊन रेडियो लहरी संपूर्ण जगात पाठवता येऊ शकतात. रेदियोत वापरत असलेला टेस्ला रॉड त्यांनीच शोध लावलेला आहे. आणि त्यांचा रेडियोचा खरा शोधक कोण यावरीन मार्कोनी सोबत खुप काळ खटला देखील चालला. त्यांनी
Wireless power supply चा अविष्कार केला जो पुढे जाऊन लेसर किरणांचा आधार बनला.
आपल्या एका प्रेजेंटेशन मध्ये त्याने लाखो वोल्ट ताकदीची आकाशातील वीज निर्माण करून सर्वाना हैराण केले. एकदा त्याने आपले उपकरण टेलास्कोप मध्ये काही अज्ञात सिग्नल पकडले जे त्याच्या मते एखाद्या परग्रहावरून आलेले होते.
१८९९ आणि १९०० च्या मध्यात त्यांनी कोलोराडो धबधब्यात एका प्रयोगाच्या दरम्यान कृत्रिम वीज निर्माण करून सर्वाना आश्चर्यात टाकले होते.
निकोला टेस्ला यांनी आपल्या जीवनकाळात ३०० पेटंट प्राप्त केले. परंतु त्यांच्या व्यतिरिक्त त्यांनी असे कित्येक अविष्कार घडवले आहेत ज्यांचे त्यांनी पेटंट घेतलेले नाही.