Get it on Google Play
Download on the App Store

मृत्यू नंतर काय होते



सामान्य व्यक्ती जेव्हा शरीराचा त्याग करते, तेव्हा सर्वप्रथम त्याच्या नजरेसमोर गाढ अंधार पसरतो, तिथे त्याला कसलीही जाणीव होत नाही. काही वेळेपर्यंत काही आवाज ऐकू येतात किंवा काही दृश्य दिसतात जसे की स्वप्नात होते, आणि मग हळू हळू तो गाढ निद्रेत हरवून जातो, अगदी तसा जसा कोणी कोमात जातो.
गाढ निद्रेत काही लोक अनंत काळापर्यंत हरवून जातात, तर काही जण या अवस्थेतच एखाद्या दुसऱ्या गर्भातून जन्म घेतात. सृष्टी त्यांना त्यांचे भाव, विचार आणि जागरण अवस्था यांच्या नुसार गर्भ उपलब्ध करून देते. ज्याची जशी योग्यता तसा गर्भ, किंवा ज्याची जशी गती तशी सुगती किंवा दुर्गती. गतीचा संबंध मतीशी असतो. सुमती तर सुगती.