Android app on Google Play

 

शुद्धीचे प्रमाण हेच गती ठरवते

 पहिल्या तीनही अवस्थांचे अनेक स्तर आहेत. कोणी जागृत राहून देखील स्वप्नासारखे जीवन जगतो, जसा एखादा कायम खयाली पुलाव करणारा किंवा नेहमी कल्पनेत जगणारा. कोणी चालता - बोलता देखील झोपेत असतो, जसा एखादा नशेत धुंद असणारा किंवा काळजीने घेरलेला किंवा ज्याला म्हणतात तामसिक असा कोणी.
आपल्या आजूबाजूला जे पशु पक्षी आहेत, ते देखील जागृत आहेत, परंतु आपण त्यांच्यापेक्षा अधिक शुद्धीत आहोत, त्यामुळेच तर आपण मानव आहोत. जेव्हा हा शुद्धीचा किंवा भानाचा स्तर खाली जातो तेव्हा आपण पशुवत बनतो. असे म्हणतात की नशेत माणूस अक्षरशः जनावर बनतो.
वृक्ष, वेली, झाडे तर आणखीनच खोल बेशुद्धीत आहेत. मृत्यू नंतर व्यक्तीचे जागरण, स्मृती कोश आणि भाव ठरवतात की त्याने कोणत्या योनीत जन्म घ्यायचा आहे. म्हणूनच वेद सांगतात की जागण्याचा सतत अभ्यास करा. जागरणच तुम्हाला सृष्टीतून मुक्त करू शकते.