Get it on Google Play
Download on the App Store

द्युत खेळताना केलेले राजकारण


खेळाच्या सुरुवातीला पांडवांचा उत्साह वाढवा यासाठी शकुनीने दुर्योधनाला सांगितले कि काही वेळ त्यांच्या पक्षात जा आणि त्यांना काही डाव जिंकुदेत. जेणे करून पांडवांच्या मनात खेळासाठी उत्साह निर्माण होईल. आणि याच खेळाच्या उत्साहात हळू हळू युधिष्ठीर आपली सर्व संपत्ती आणि राज्य हरून बसला.
शेवटी शकुनीने युधिष्ठिराला सर्व काही एका अटीवर परत देण्याचे मान्य केले, आत होती कि त्याने आपले सर्व भाऊ आणि आपली पत्नी यांचा डाव खेळावा. हतबल झालेल्या युधिष्ठिराने त्यांचे म्हणणे ऐकले आणि खेळी खेळून हा डाव देखील हरला. या खेळाच्या दरम्यान झालेला पांडव आणि द्रौपदीचा अपमान हाच महाभारताच्या युद्धाचे सर्वांत मोठे कारण बनला.