Android app on Google Play

 

शकुनी

 
जेव्हा कौरावांतील ज्येष्ठ युवराज दुर्योधनाने हे पहिले कि केवळ शकुनीच जिवंत राहिले आहेत, तेव्हा पित्याच्या आज्ञेवरून त्याने त्याला क्षमा केली आणि आपल्या देशात परत जाण्यास सांगितले किंवा हस्तिनापुरात राहून आपले राज्य पाहण्यास सांगितले. शकुनीने हस्तिनापुरात राहण्याचा निर्णय घेतला. शकुनीने हस्तिनापुरात सर्वांचा विश्वास जिंकला आणि तो १०० कौरवांचा सल्लागार बनला. विश्वासू कामे बघून दुर्योधनाने शकुनीला आपला मंत्री म्हणून नियुक्त केले.
सर्वप्रथम त्याने गांधारी आणि धृतराष्ट्र यांना वश करून धृतराष्ट्राचा भाऊ पंडू याच्याविरुद्ध कारस्थाने रचणे आणि राज सिंहासनावर धृतराष्ट्राला आधिपत्य गाजवण्यास सांगितले.
मग हळू हळू शकुनीने दुर्योधनाला आपल्या बुद्धीच्या मोहपाशात बांधून टाकले. शकुनीने केवळ दुर्योधनाला युधिष्ठिराच्या विरोधात भडकावले असेच नाही तर महाभारताच्या युद्द्धाचा पाया देखील रचला.